Car Gadgets: तुमच्याकडे स्वतःची कार असेल किंवा लवकरच कार घेण्याच्या विचारात असाल, तर तुमच्या कारमध्ये काही महत्त्वाचे गॅजेट्स असायला हवे. या गॅजेट्समुळे तुम्ही अचानक आलेल्या अडचणींपासून वाचू शकता.
एअर कंप्रेसर/टायर इन्फ्लेटरहे गॅजेट तुमच्या कारमध्ये असायला हवे. तुम्ही लांबच्या प्रवासाला जात असाल, तर तुमच्या कारमध्ये बॅटरीवर चालणारे टायर इन्फ्लेटर किंवा एअर कंप्रेसर असणे गरजेचे आहे. प्रवासात अचानक टायरची हवा कमी झाल्यास, हे गॅजेट तुमच्या कामी येईल. टायर इन्फ्लेटरची किंमत 2000 ते 4000 रुपये आहे.
डॅश कॅमेरातुमच्या वाहनात डॅश कॅम बसवण्याचे अनेक फायदे आहेत. पहिला फायदा असा की, तुम्ही तुमचा संपूर्ण प्रवास रेकॉर्ड करू शकता. प्रवासात एकादी दुर्घटना घडल्यास या कॅमेऱ्यातील व्हिडिओ पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो. हे गॅजेट तुमच्या सुरक्षेसाठी खुप महत्वाचे आहे.
मिनी एअर प्युरिफायरआजकाल कारच्या टॉप मॉडेल्समध्ये एअर प्युरिफायर आधीच दिलेले असते, पण जर तुमच्या कारमध्ये एअर प्युरिफायर नसेल तर तुम्ही बाजारातून विकत घेऊ शकता. यामुळे तुमच्या कारमधून घाण वास येणार नाही. बाजारात 2000 ते 5000 रुपयांपर्यंत चांगले एअर प्युरिफायर मिळते.
हेड अप डिस्प्लेतुम्हाला कार चालवताना तुमच्या ड्रायव्हिंग पॅटर्नवर लक्ष ठेवायचे असेल, तर या गॅजेटमुळे स्पीडोमीटर पाहण्याची गरज भासणार नाही. तुम्ही आता तुमच्या कारमध्ये हेड अप डिस्प्ले इंस्टॉल करू शकता. हा डिस्प्ले डॅश बोर्डवर बसवतात. यातून मायलेज, स्पीड इत्यादीची माहिती मिळते. त्याची किंमत 2000 ते 5000 रुपये आहे.