नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहनांच्या वाढत्या मागणीमुळे ऑटो कंपन्या सातत्याने इलेक्ट्रिक वाहने लाँच करत आहेत. दरम्यान, ऑटोमोटिव्ह स्टार्ट-अप Evtric मोटर्सने सोमवारी स्लो-स्पीड कॅटगरीमध्ये दोन इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आणल्या आहेत. (EVTRIC Electric Scooters Launch Price Rs 65k – Bookings Open At Rs 0)
या इलेक्ट्रिक स्कूटर Evtric AXIS आणि Evtric RIDE नावाने लाँच करण्यात आल्या आहेत. Evtric AXIS ची किंमत 64,994 रुपये आहे आणि Evtric RIDE ची किंमत 67,996 रुपये ठेवण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या दोन्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या बुकिंगवर कोणतीही रक्कम द्यावी लागत नाही.
या इलेक्ट्रिक स्कूटर तुम्हाला खरेदी करायच्या असल्यास तुम्ही अधिकृत वेबसाईट (https://evtricmotors.com/) किंवा ऑफलाइन पद्धतीने कोणतीही बुकिंग रक्कम न भरता बुक करू शकता.
या इलेक्ट्रिक स्कूटर एक स्वॅपेबल लिथियम-आयन बॅटरीसह येते, जी 250W ची पॉवरसह 150 किलो लोडिंग क्षमतेने लॅस आहे. याची बॅटरी फूल चार्ज होण्यासाठी सुमारे 3.5 तास लागतात. तसेच, टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आहे.
फूल चार्ज झाल्यावर या इलेक्ट्रिक स्कूटर 75 किलोमीटरपर्यंत धावू शकतात. Evtric AXIS चार रंगांमध्ये उपलब्ध आहे, ज्यामध्ये मर्करी व्हाइट, फारसी रेड, लेमन येलो आणि एम्परर ग्रे आहे. तर Evtric RIDE डीप सेरुलियन ब्लू, फारसी रेड, स्लिव्हर, नोबेल ग्रे, मर्क्युरी व्हाईट मध्ये उपलब्ध आहे.