शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
Daily Top 2Weekly Top 5

Evtric Motors: ईव्हट्रीकने आणली एक मोटरसायकल, दोन स्कूटर; जाणून घ्या रेंज आणि वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 20:01 IST

Evtric Motors showcased three two wheelers: ग्रेटर नोएडाच्या इंडिया एक्सपो सेंटरमध्ये सुरु असलेल्या ईव्ही इंडिया एक्सपो 2021 या तीन टू व्हीलर शोकेस करण्यात आल्या. 

Evtric Motors ने शुक्रवारी हाय स्पीड कॅटेगरीमध्ये तीन नवीन इलेक्ट्रीक मोटरसायकल आणि स्कूटर भारतीय बाजारात आणल्या आहेत. यामध्ये Evtric Rise (मोटरसाइकिल), Mighty (स्कूटर) आणि Evtric Ride Pro (स्कूटर) आहेत. ग्रेटर नोएडाच्या इंडिया एक्सपो सेंटरमध्ये सुरु असलेल्या ईव्ही इंडिया एक्सपो 2021 या तीन टू व्हीलर शोकेस करण्यात आल्या. 

बाईकचा वेग आणि रेंजEvtric Rise इलेक्ट्रिक बाइकमध्ये काढता येणारी 3.0 KWH लिथियम-आयन बॅटरी वापरण्यात आली आहे. या बॅटरीला फुल चार्ज केल्यावर ही बाईक 120 किमीची ड्रायव्हिंग रेंज देते. Evtric Rise चा सर्वाधिक वेग हा 100 किमी प्रति तास आहे. 

दोन स्कूटरचा वेग आणि रेंजयाशिवाय कंपनीने दोन स्कूटर Mighty आणि Ride Pro देखील दाखविल्या आहेत. Ride Pro ही एक हाय स्पीड ई स्कूटर आहे. याचा ट़ॉप स्पीड 75 किमी प्रति तास आहे. एकदा चार्ज केली की 90 किमीचे अंतर कापते. कंपनीने आणखी एक स्कूटर लाँच केली आहे. या स्कूटरचे नाव मायटी आहे. या स्कूटरचा वेग 70 किमी प्रति तास असून ती देखील एकदा चार्ज केल्यावर 90 किमीचे अंतर कापू शकते. 

इव्हट्रिक मोटर्सचे संस्थापक आणि एमडी मनोज पाटील म्हणाले, “संपूर्ण इव्हट्रिक टीम भारतातील ईव्ही दुचाकी उद्योगात दर्जा उंचावणारी दर्जेदार उत्पादने सादर करण्यासाठी खूप प्रयत्न करत आहे. उद्योगातील मान्यवर, अभ्यागत, वाहन तज्ज्ञ आणि वापरकर्ते यांच्याकडून प्रशंसा मिळवणाऱ्या नवकल्पनांचे प्रदर्शन करण्याची आम्हाला योग्य संधी आहे."

टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहन