केंद्र सरकारने 15 फेब्रुवारीपासून फास्टॅग (FASTag) सर्व वाहनांना आवश्यक केला आहे. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून फास्टॅग अस्तित्वात असला तरीदेखील टोल प्रणालीतील दोष काही सरकारला आणि संबंधित यंत्रणेला दूर करता आलेले नाहीत. दुप्पल टोल भरावा लागेल म्हणून जवळपास 75 टक्के वाहनचालकांनी फास्टॅग लावलेले आहेत. मात्र, खात्यात पैसे असूनही ते कापले न गेल्याने टोलनाक्यावर दुप्पट पैसे भरावे लागल्य़ाचे अनेक प्रकार समोर आले आहेत. यावर आता एमएसआरडीसीने खुलासा केला आहे. (Fastag Scan fail then vehicle user shall be permitted to pass the fee plaza without payment of any user fee. An appropriate zero transaction receipt shall be issued mandatorily for all such transaction.)
FASTag problems: टोल दोनदा कापला तर काय? FASTag बाबत अद्याप न पडलेले प्रश्न...केंद्र सरकारने यासाठी तरतूद करून ठेवली आहे. केंद्र सरकारने काढलेल्या जीआरमध्ये असे म्हटले आहे की, जर तुमच्या फास्टॅगच्या वॉलेटमध्ये पैसे आहेत आणि हा फास्टॅग स्कॅन करण्यात अडचण आली तर टोलनाक्यावर टोल भरण्याची गरज नाही. याला एमएसआरडीसीचे संचालक राधेश्याम मोपलवार यांनीदेखील दुजोरा दिला आहे.
एकच FASTag दोन गाड्यांना वापरता येतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरेसंदीप खरेंनी मांडला मुद्दा...प्रसिद्ध कवी आणि गायक संदीप खरे यांना पुणे-कोल्हापूर महामार्गावरील किणी टोलनाक्यावर अत्यंत वाईट अनुभव आला. हा प्रकार त्यांनी फेसबुकद्वारे सांगितला आहे. माझ्या गाडीवरील FASTag स्कॅन न झाल्याने टोल प्लाझावरील कर्मचाऱ्याने गाडी थांबवली. त्यानंतर एका छोट्या मशीनने तो टॅग स्कॅन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो झाला नाही. त्यानंतर तुम्हाला दंड भरावा लागेल, असं सांगण्यात आलं. यात टोल ७५ आणि दंड ७५ रुपये अशी रक्कम भरण्यास सांगण्यात आले. त्यावर माझ्याकडे फास्टॅग असल्याने मी भरणार नसल्याची भूमिका घेतली, असं संदीप खरे यांनी व्हिडिओद्वारे सांगितले.
IMP बातमी! FASTag नसेल तर थर्ड पार्टी विमाही मिळणार नाही; केंद्राचा मोठा नियम बदलयानंतर लोकमतच्या प्रतिनिधीने एमएसआरडीसीचे संचालक मोपलवार यांच्याशी संपर्क साधला, तसेच त्यांना हा जीआर दाखविला. तेव्हा त्यांनी दुप्पट टोल आकारता येत नसल्याचे सांगत जर तुमच्या फास्टॅगमध्ये पुरेसे पैसे असतील आणि तुमचा फास्टॅग स्कॅन झाला नाही तर टोल भरण्याची आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. अशी तांत्रिक अडचण आल्यास वाहन चालकाला शून्य टोलची पावती द्यावी लागणार आहे, असेही या आदेशात नमूद आहे. खरेतर हा आदेश 2018 मध्येच काढण्यात आलेला आहे, तरीही वाहनचालकांची टोलनाक्यांवर लूट केली जात आहे. या परिस्थितीला जबाबदार कोण, असा प्रश्न आता वाहन चालकांना पडला आहे.
याची झेऱॉक्स नक्की गाडीत काढून ठेवा....