देशात इलेक्ट्रिक स्कूटर सेग्मेंटमधील स्पर्धा सातत्याने वाढताना दिसत आहे. आता बेंगळुरू बेस्ड स्टार्टअप सिंपल एनर्जीने (Simple Energy) आज देशांतर्गत बाजारात आपली दुसरी इलेक्ट्रिक स्कूटर Simple Dot One लॉन्च केली आहे. ही नवी इलेक्ट्रिक स्कूटर बाजारात आल्याने या सेगमेंटमधील लीडर असलेल्या ओला आणि अथर यांच्यासाठी स्पर्धा अधिक वाढली आहे.
कंपनीने ही स्कूटर 99,999 रुपयांच्या बेसिक किंमतीवर लॉन्च केली आहे. जी प्री-बुकिंग युनिट्ससाठी लागू असेल. ग्राहकांना ही स्कूटर कंपनीच्या आधिकृत वेबसाइटच्या माध्यमाने बुक करता येऊ शकते.
कंपनीने ही स्कूटर सध्या प्रास्ताविक किंमतीसह सादर केली आहे. ही किंमत केवळ प्री-बुक्ड युनिट्ससाठीच लागू असेल. अर्थातच, येणाऱ्या काळात कंपनी हिच्या किंमतीत वाढ करू शकते. नव्या ग्राहकांसाठी हिच्या किंमतीची घोषणा जानेवारी महिन्यात केली जाऊ शकते. कंपनीने Simple Dot One फिक्स्ड बॅटरी बॅकसह लॉन्च केली आहे.
बॅटरी रेंज आणि परफॉर्मन्स -Simple Dot One मध्ये कंपनीने 3.7 kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला आहे. हा बॅटरी पॅक सिंगल चार्जमध्ये 151 किलोमीटर पर्यंतची ड्राव्हिंग रेंज देईल. ही स्कूटर Namma Red, Brazen Black, Grace White and Azure Blue अशा एकूम 4 रंगांमध्ये उपलब्ध आहे. डॉट वन 750W चार्जरसह येते.
केवळ 2.77 सेकंदातच 0 ते 40 किलोमीटर प्रतितास एवढा स्पीड -कंपनीने या स्कूटरमध्ये 8.5kW क्षमतेच्या इलेक्ट्रिक मोटारचा वापर केला आहे. जी 72Nm टॉर्क जनरेट करते. याशिवाय या स्कूटरसाठी विशेष पद्धतीच्या ट्यूबलेस टायरचा वापर करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, ही स्कूटर केवळ 2.77 सेकंदातच 0 ते 40 किलोमीटर प्रतितास एवढा स्पीड धारण करू शकते, असा दावाही कंपनीने केला आहे.