शहरं
Join us  
Trending Stories
1
निलंबित PSI रणजीत कासले पुण्यात दाखल; निवडणुकीत गप्प राहण्यासाठी कराडने पैसे दिल्याचा आरोप
2
IPL 2025 MI vs SRH : वानखेडेच्या खेळपट्टीनं रंग बदलला; पण MI नं विजयाचा ट्रॅक नाही सोडला!
3
परत पदावर येऊन धनंजय मुंडेंच्या हातून समाजसेवा घडावी; नामदेवशास्त्रींचे विधान, जरांगे भडकले
4
तात्पुरता दिलासा की क्लीन चिट? ससूनच्या चार पानी अहवालात दीनानाथ रुग्णालय, डॉ. घैसास यांच्यावर ठपका नाही
5
MI vs SRH : ३०० धावसंख्येची भविष्यवाणी करुन फसला माजी क्रिकेटर; आता शब्दांचा खेळ, म्हणाला...
6
दूतावासामधून तक्रार, सरकारने जेएनयूच्या ज्येष्ठ प्राध्यापकांना तातडीने केलं बरखास्त, केलं होतं धक्कादायक कृत्य
7
“हिंदी सक्तीने लादणे हा मराठीवर अन्याय, मराठी भाषिकांच्या अस्मितेवर घाला”: विजय वडेट्टीवार
8
पांड्याचं सेलिब्रेशन झालं! हेडनं मान खाली घालून पॅव्हेलियनचा रस्ता धरलेला अन् 'सायरन' वाजला
9
वेलांटी, मात्रा चुकल्याने बोगसपणा उघड; शिक्षण घोटाळ्यात बोगस कागदपत्रे बनविणारा अखेर सापडला
10
भाजपाचे ज्येष्ठ नेते दिलीप घोष वयाच्या ६१ व्या वर्षी बांधणार लग्नगाठ, पक्षाच्या महिला कार्यकर्तीसोबत अडकणार विवाह बंधनात
11
अजितदादा-शरद पवार एकत्र येण्यासाठी पांडुरंगाच्या चरणी साकडे घातले का? सुनील तटकरे म्हणाले...
12
…तर ते कागद दाखवावे लागतील?, नव्या ‘वक्फ’ कायद्यावरील सुनावणीत ती मेख, केंद्र होणार खूश   
13
देवेंद्र फडणवीसांच्या विधानसभा २०२४ च्या विजयाला आव्हान; हायकोर्टाने समन्स बजावले
14
आयटेलचा 'एआय'वाला ए९५ स्मार्टफोन लाँच; १०,००० च्या आत किंमत...
15
IPL 2025 MI vs SRH : काय करायचं त्या बॉलरनं? दीपक चाहरनं जोर लावला! पण...
16
VIDEO: परप्रांतीय विक्रेत्याने गटारात धुतले ताडगोळे; खेडमधील किळसवाणा प्रकार
17
बॉम्ब हल्ला प्रकरणात लष्कराच्या जवानाला अटक; गँगस्टरला इंस्टाग्रामवरुन दिले ग्रेनेड फेकण्याचे प्रशिक्षण
18
आम्ही पळून जाणाऱ्यातले नाही, लढत राहू;अजित पवारांच्या स्वागतफलकाबाबत रोहित पवारांनी केला खुलासा
19
...तर अमेरिकनांचा इन्कम टॅक्स कायमचा बंद होईल; टेरिफ वॉरवरून ट्रम्पनी स्वत:चीच पाठ थोपटून घेतली
20
वक्फ कायद्यात एक जरी चूक निघाली तरी खासदारकीचा राजीनामा देणार; जेपीसी अध्यक्षांची मोठी घोषणा

Electric Vehicle: इलेक्ट्रीक कार, स्कूटर घेण्याची पाच महत्वाची कारणे; जाणून घ्या...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2021 17:40 IST

Electric Car, Scooter Benefits : इलेक्ट्रीक वाहनांचे समज-गैरसमज, फायदे तोटे आपण याआधी पाहिले आहेत. आता इलेक्ट्रीक वाहने घेण्याची पाच कारणे पाहुयात जी पेट्रोल, डिझेलच्या किंवा सीएनजीच्या कार, स्कूटरमध्ये सापडणार नाहीत.

हवामानाच्या संकटाकडे दुर्लक्ष करणे, दिवसेंदिवस कठीण होत आहे, अनेक देश तसेच व्यक्ती याविषयीचे महत्त्व व त्याच्या परिणामांबाबत जगभरात जागरूकता निर्माण करत आहेत. वैयक्तिक पातळीवर कार्बन फुटप्रिंट कमी करताना नियामक पातळीवर प्लास्टिकचा वापर बंद करणे, तसेच तो कमी करण्यासाठी लोक मार्ग शोधत आहेत. याद्वारे वेळेतच पर्यावरणाला झालेले नुकसान भरून काढण्याचा प्रयत्न करत आहेत. स्वच्छ उर्जेवर चालणा-या वाहनांकडे वळणे, हे श्वाश्वततेवर आधारीत भवितव्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे. विविध वाहन निर्मात्या कंपन्यांनीही आता इलेक्ट्रिक वाहन (Electric car) निर्मितीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. (five reasons and benifits to buy a Electric car, scooter.)

ईलेक्ट्रिक वाहने ही भविष्यातील वाहने: वाहन क्षेत्रातील सध्याच्या प्रगतीच्या मार्गानुसार, ईव्हीमध्ये एक तर्कशुद्ध बाब आहे. जीवाश्म इंधनावर चालणाऱ्या  वाहनांना बाजूला सारण्याचे वाढते प्रमाण, यातच या ट्रेंडचे भवितव्य दिसून येते. तांत्रिक प्रगतीमुळे अपारंपरिक, शाश्वत ऊर्जा स्रोत हे अधिक व्यवहार्य आणि किंमतीनुसार प्रभावी असून वाहन उद्योग वेगाने नावीन्यपूर्ण वीज निर्मिती पर्याय स्वीकारत आहे. परिणामी, इलेक्ट्रिक आधारीत वाहने ही सर्वसामान्य बनत असून, इंटर्नल कम्बस्शचन इंजिन्स (आयसीई) हे या चक्रात मागे पडत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांसंबंधीचे हे आहेत 5 मोठे गैरसमज; जाणून घ्या MG Moters च्या ZS EV कडून...

  • खात्रीशीररित्या कनेक्टेड कार: एआय आयओटी-आधारीत तंत्रज्ञानाच्या उदयामुळे कनेक्टेड, स्मार्ट सोसायटीज या संकल्पनेकडे जग प्रगती करत आहे. भविष्यातील दृष्टीकोन हा अधिक स्पष्टतेकडे नेणारा असून यात प्रकारच्या अत्याधुनिक वाहन वैशिष्ट्यांचा तसेच ऑपरेशन्सचा समावेश आहे.
  • इलेक्ट्रिक वाहनांमध्ये, आपण अनेक गंभीर गोष्टींवर नियंत्रण ठेवू शकतो. उदा. आपले वाहन जिओफेन्सिंग करणे, त्याचे लोकेशन तपासणे, जवळपासचे चार्जिंग स्टेशन शोधण्यासाठी चार्जिंगची स्थिती पाहणे, इथपासून दूरूनच कार प्री कूल किंवा प्री हीट करण्यासाठी एसी सिस्टिम स्मार्टफोनद्वारे अॅक्टिव्हेट करता येते. यासह, जगातील अग्रगण्य उत्पादकांनी तयार केलेल्या ईव्हींमध्ये इन-बिल्ट ओटीए क्षमता असतात. म्हणजेच ही कार नेहमीच कनेक्टेड असून सर्वाधिक अप-टू-डेट माहितीनुसार काम करते.कारचे अ‍ॅव्हरेज कमी झालेय का? या ट्रिक फॉलो करा, 10 टक्के जास्त मिळवा... 
  • उत्तम लेगरूम व स्टोरेज: दुचाकी असो वा चार चाकी सर्व ईव्ही गिअरलेस आहेत. याचा अर्थ असा की, या वाहनांमध्ये अधिक प्रशस्त आणि आरमदायक केबिन, अधिक लेगरुम आणि मोठी स्टोरेजची जागा असते. गिअर लिव्हर नसल्याचा आणखी एक अर्थ असा की, केबिनच्या मागील भागात एक सपाट जागा असेल, त्यामुळे मध्यभागी बसलेल्या प्रवाशाला उत्तम प्रवासाचा आनंद मिळेल. पारंपरिक इंटरनल कम्बस्शचन इंजिन नसल्यामुळे समोरील हुडखाली मोठी जागा असून जास्त स्टोरेज पर्याय मिळतात.Car Driving Tips: पेट्रोल, डिझेलचे दर वाढतायत; अशी घाला वाहनाच्या घटत्या मायलेजला लगाम... 
  • शांततेची अनुभूती मिळते: कोणतीही यांत्रिक इंजिन नाही म्हणजे गोंगाट नाही. इलेक्ट्रिक मोटर कोणताही आवाज न करता काम करते. त्यामुळे प्रवासी आणि चालकाला आवाज विरहित प्रवासाचा अनुभव घेता येतो. कोणत्याही अडथळ्याविना तुम्ही पुस्तक वाचू शकतात आणि संगीताचा अनुभव घेऊ शकता. यात कोणत्याही अप्रिय गोष्टींची अडचण येणार नाही.एकच FASTag दोन गाड्यांना वापरता येतो? जाणून घ्या तुम्हाला पडलेल्या प्रश्नांची उत्तरे 
  • सुपर स्मूथ ड्रायव्हिंगचा अनुभव: इलेक्ट्रिक मोटर ही केवळ आवाजविरहित असते, असे नव्हे तर टॉर्कच्या बाबतीतही ही अधिक आकर्षक आणि उत्कृष्टतेचा अनुभव देते. यामुळे सर्वोत्कृष्ट व विनाअडथळा वाहन चालवण्याचा अनुभव मिळतो, जो इतर पारंपरिक वाहनांमध्ये सहसा दिसून येत नाही.याची झेरॉक्स ठेवा! खात्यात पैसे आहेत, पण FASTag स्कॅन झाला नाही, टोलनाक्यावरून फुकटात जा... 
टॅग्स :electric vehicleवीजेवर चालणारं वाहनElectric Carइलेक्ट्रिक कारAutomobileवाहन