नवी दिल्ली : फोर्ड इंडियाची सेदान कार Ford Aspire ने कात टाकली असून नवी फेसलिफ्ट येत्या 4 ऑक्टोबरला भारतात सादर केली जाणार आहे. सध्याच्या अस्पायरच्या तुलनेत नव्या कारच्या स्टाईलमध्ये मोठे बदल करण्याच आले असून नवीन फिचर्सही देण्यात आले आहेत. तसेच पेट्रोल इंजिन बदलण्यात आले असून 1.2 लीटर ड्रॅगन सिरिजचे नवे इंजिन यावेळी लाँच केले जाणार आहे. या कारची बुकिंगही सुरु करण्यात आले आहे.
फोर्ड इंडियाचे मार्केटींगचे उपाध्यक्ष राहुल गौतम यांनी सांगितले की, नवीन Ford Aspire अन्य कंपन्यांच्या कारपेक्षा वेगळी आहे. ग्राहकांना या कारमुळे वेगळा चालविण्याचा अनुभव मिळणार आहे. 11 हजार रुपयांमध्ये कार बुक करता येणार आहे.अस्पायरच्या नव्या मॉडेलमध्ये नवीन फ्रंट ग्रिल, नवीन बंपर आणि नवे अलॉय व्हील्स देण्यात आले आहे. कारच्या केबिनमध्येही बरेच बदल करण्यात आले आहेत. नवीन टचस्क्रीन इन्फोटेन्मेंटही यामध्ये देण्यात आली आहे. याशिवाय कारमध्ये अॅटो क्लायमेट कंट्रोल आणि स्टार्ट-स्टॉप बटन असणार आहे.
अस्पायर ही कॉम्पॅक्ट सेदान कार Maruti Suzuki DZire, Hyundai Xcent, Honda Amaze आणि Volkswagen Ameo ला टक्कर देणार आहे.