- हेमंत बावकर
What next After Ford stopped production in India: जगातील सर्वात मोठ्या वाहन निर्माता कंपन्यांपैकी एक असलेल्या फोर्डने भारतातून काल एक्झिट (Ford exit) करण्याचा निर्णय घेतला. वाहनांची कमी विक्री, कोरोना काळ यामुळे कंपनी मेटाकुटीला आली होती. फोर्डचे भारतात दोन प्लांट होते. त्यापैकी एक प्लांट देण्याची चर्चा गेल्या दोन महिन्यांपासून होती. परंतू दोन्ही प्लँट बंद करण्याची तयारी कंपनीने त्या आधीपासूनच केली होती. यामुळे आधीच बदनाम झालेल्या फोर्डवर विश्वास ठेवून कार घेणाऱ्या आणि कर्मचाऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. कंपनीने या कार मालकांना सर्वप्रकराची सेवा देण्याचे आश्वासन दिलेले असले तरीदेखील जनरल मोटर्सनंतर फोर्डचे जाणे धक्कादायक आहे. आता फक्त फोर्डकडे 1000 कार उरल्या आहेत. (What will be happened with Ford Employees, Showroom, Service center's car owner's? nothing said yet.)
फोर्डने फ्रिस्टाईल, फिगो, अस्पायर, ईकोस्पोर्ट, एंडेव्हर या कारचे उत्पादन थांबविण्याचा निर्णय घेतला आहे. परंतू या कारची उत्पादने आधीच थांबविण्यात आली होती, असे फोर्डच्या कर्मचाऱ्यांशी बोलल्यानंतर समोर आले आहे. फोर्डने डिझेल मॉडेलचे उत्पादन तीन महिने आधीच थांबविले होते. यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून डीलर बहुतांश गाड्या या पेट्रोल मॉडेलच्याच विकत होते. अस्पायर सीएनजी, इकोस्पोर्टचे फेसलिफ्ट येणार असल्याच्या बातम्या पसरविल्या जात होत्या. यामुळे कंपनी नवीन तंत्रज्ञान, फीचरच्या गाड्या लाँच करेल आणि ग्रीप मिळेल याच भ्रमात फोर्डचे कर्मचारी देखील राहिले होते. परंतू कालच्या घोषणेने त्यांच्या पायाखालची वाळूच घसरली आहे. काहींनी प्लाँट बंद होणार या तत्कालीन अफवांमुळे आधीच दुसरीकडे नोकरी पत्करली होती. परंतू, अनेकजण डीलर आणि कंपनी यांच्यावर विश्वास असल्याने तिथेच राहिले होते. आता त्यांच्या डोक्यात हजारो प्रश्न पडू लागले आहेत. या कर्मचाऱ्य़ांना कंपनी, डीलर वाऱ्यावर सोडणार नाही, काहीतरी करेल अशी आशा आहे.
वाहन मालकांना त्यांच्या वाहनांची चिंता सतावत आहे. छोट्या छोट्या शहरांत उघडलेली सर्व्हिस सेंटर बंद केली तर सर्व्हिससाठी मोठ्या शहरांत जाण्याच भुर्दंड, महागडे स्पेअरपार्ट, लुबाडणूक आदी गोष्टी परतण्याची भीती त्यांना वाटत आहे. तर दुसरीकडे आधीच कारची रिसेल व्हॅल्यू कमी होती, आता तर कोणी घेणारपण नाही यामुळे विक्री करण्याचा विचारही ते करू शकत नाहीत अशा द्विधा मनस्थितीत ते आहेत. सोशल मीडियावर अशा ग्राहकांच्या शंका कुशंका व्यक्त होत आहेत.
डीलरशीप बंद होणार, सर्व्हिस सेंटर सुरु राहणारकार विक्रीसाठीच नसल्याने डीलरशीप बंद होणार आहेत. तर त्यांची सर्व्हिस सेंटर सुरु राहणार आहेत. मस्तंग, एंडोव्हर इम्पोर्ट होणार असल्याने या कारचा जिथे सेल होता, तेथील आणि महत्वाच्या शहरांतील डीलरशीप सुरु राहतील. परंतू छोट्या कार आता यापुढे मिळणार नाहीत. तसेच जी सर्विहस सेंटर तोट्यात होती, ती देखील बंद होण्याची शक्यता आहे किंवा ती स्थलांतरीत होण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांना दुसरीकडे ऑफर पण कमी पगारातफोर्डच्या कर्मचाऱ्यांना अन्य कंपन्यांच्या सर्विहस सेंटर किंवा शोरुममध्ये नोकरी देण्याची ऑफर मिळत आहे. परंतू ही ऑफर फोर्डमध्ये होता त्यापेक्षा निम्म्या पगाराची आहे. एकीकडे नोकरी गेली तर काय असा प्रश्न असताना दुसरीकडे कमी पगारात काम कसे परवडेल असा प्रश्न या कर्मचाऱ्यांसमोर पडला आहे. कंपनीने अद्याप कर्मचारी, डीलर यांना विश्वासात घेतलेले नाही. या निर्णयाची सारे वाट पाहत आहेत.