Tata Nano Solar Car: भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती अक्षरशः आकाशाला भिडल्या आहेत. यामुळे लोक इलेक्ट्रिक कारकडे पर्याय म्हणून पाहत आहेत. मात्र असे असले तरी सध्या इलेक्ट्रिक कार बहुतांश ग्राहकांच्या बजेट बाहेर आहेत. यातच आता, पश्चिम बंगालमध्ये सूर्यप्रकाशावर चालणारी टाटा नॅनो समोर आली आहे. विशेष म्हणजे या कारचा 100 कि.मी.पर्यंत धावण्याचा खर्च केवळ 30 रुपये एवढा आहे.
पश्चिम बंगालमधील एका व्यक्तीने स्वतःच ही कार मोडिफाय केली आहे. या कारची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. मनोजित मंडल नावाच्या एका व्यक्तीने ही कार तयार केली आहे. ही कार पूर्णपणे सौर उर्जेवर चालते. या कारला कसल्या प्रकारचे इंजिनही नाही. कारच्या छतावर सौर पॅनल लावण्यात आले आहे. PTI ने या लाल नॅनो कारचा एक व्हिडिओही शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मिडियावार जबरदस्त व्हायरल होत आहे. खरे तर ही टाटा नॅनो एक प्रकारची इलेक्ट्रिक कारच आहे,जिची बॅटरी सौर ऊर्जेवर चार्ज होते.
बिना पेट्रोलची ही सोलर कार 100 किलोमीटरपर्यंत चालविण्यासाठी जवळपास 30 रुपये एवढा खर्च येतो. तसेच, या कारला कसल्याही प्रकारचे इंजिन नसल्याने, ही कार इलेक्ट्रिक कार प्रमाणेच सायलेंट आहे. नॅनो सोलर कार 80 किमी प्रति तास एवढ्या वेगाने चालू शकते.
व्यापाऱ्याचे म्हणणे आहे की, या प्रयोगासाठी त्यांना सरकारकडून फारसे सहकार्य मिळाले नाही. पण, लहानपणापासूनच त्यांची हे स्वप्न पूर्ण करण्याची इच्छा होती. त्यांनी महागड्या पेट्रोलपासून मुक्ती मिळावी यासाठी, आपली टाटा नॅनो मॉडिफाय केली आहे.