जगभरात जलवायू परिवर्तनच्या संकटावर हरतऱ्हेने प्रयत्न केले जात आहेत. यासोबतच वायू प्रदुषणावर लगाम घालण्यासाठी जगभरातील बडे देश कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या मागे लागले आहेत. यामुळे जगभरात इलेक्ट्रीक व्हेईकल बनविण्यास कंपन्यांनी सुरुवात केली आहे. आता या प्रयत्नांना हायड्रोजनवर (Hydrogen fuel) चालणाऱ्या वाहनांची जोड मिळणार आहे. यासाठी कमी किंमतीवर हायड्रोजन गॅस (Hydrogen Gas) बनविण्यासाठी आणि कमी गॅसवर जास्त मायलेज देणारे तंत्रज्ञान विकसित केले केले जात आहे. (vehicles is coming on Hydrogen fuel, Indian company devoloping technolgy. )
वाहन निर्माता कंपन्या पेट्रोल, डिझेल, सीएनजी आणि एलपीजीनंतर आता सेमी हायब्रिड आणि फुल्ली हायब्रिड कारे बनवून ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करत आहेत. परंतू आतापर्यंत ऑटोमोबाईल कंपन्या नेक्स्ट फ्युअल सेल (हायड्रोजन पावर फ्युअल) वर चालणाऱ्या गाड्या बनविण्याची तयारी या कंपन्यांनी केली आहे.
भारतात नुकतीच हायड्रोजन कारची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे. या कारला काउंन्सिल ऑफ साइंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्चने एका खासगी कंपनीसोबत मिळून तयार केले आहे. कारच्या टँकची क्षमता 1.75 किलोग्रॅम हायड्रोजन एवढी आहे. हायड्रोजन गॅस फुल असताना 65 ते 70 किमी प्रति तासाच्या वेगाने धावते, तसेच फुल टँकमध्ये 250 किमी अंतर कापते. या हायड्रोजनवर चालणाऱ्या कारचे तंत्रज्ञान भारतातच तयार करण्यात येत आहे. याचा वापर लवकरच सार्वजनिक बसे, ट्रकमध्ये करण्यात येण्याची शक्यता आहे.