कार प्रेमींसाठी हा महिना खूप चांगला जाणार आहे. वास्तविक, मारुतीनं अपडेटेड बलेनो कार देखील लाँच केली आहे आणि टोयोटाने न्यू ग्लान्झा (२०२२ टोयोटा ग्लान्झा) सादर केली आहे. हा महिना संपायला अजून काही दिवस बाकी असून याच काळात आणखी चार नवीन कार लाँच होणार आहेत. होळीनंतर या कार लाँच केल्या जातील. त्यांची नावे Tata Altroz Automatic, Jeep Meridian, Maruti Ertiga आणि Maruti Suzuki XL6 अशी आहेत. यातील तीन कारचे मॉडेल आधीच बाजारात उपलब्ध असले तरी, जीप मेरिडियन अनेक चांगल्या वैशिष्ट्यांसह बाजारात लाँच होणार आहे. ती एक एसयूव्ही कार असणार आहे.
टाटा अल्ट्रोझ ऑटोमॅटिकटाटा मोटर्सने 21 मार्च रोजी त्यांची अल्ट्रोझ कार लॉन्च करणार असल्याचं आधीच जाहीर केलं आहे. ही डीसीटी पेट्रोल ऑटोमॅटिक कार असेल. या कारचे प्री-बुकिंग सुरू झाले असून, केवळ २१ हजार रुपये भरून या कारचे बुकिंग करता येईल. या कारला 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड इंजिन मिळेल. हे इंजिन 86bhp पॉवर आणि 113Nm टॉर्क जनरेट करेल.
जीप मेरिडियनजीपची ही थ्री-रो एसयूव्ही कार असेल आणि २९ मार्चपासून यावरून पडदा हटवला जाईल. त्याचा लूक जीप कमांडरसारखा आहे. या कारची लांबी कंपासपेक्षा जास्त असेल. यात केबिनची जागाही अधिक आहे. जीप मेरिडियनमध्ये, कंपनी 2.0-लिटर 4-सिलेंडर मल्टी-जेट टर्बो डिझेल इंजिन ऑफर करेल जी 9-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडली जाऊ शकते.
मारुती लाँच करणार दोन कारकार आणणार आहे, ज्यांची नावे Ertigaal आणि XL6 आहेत. त्यांना डीलरशिपवर नेण्याचे काम कंपनीने केले आहे. या दोघांच्या लॉन्चिंगची तारीख लवकरच जाहीर करणार आहे. या दोन्ही कारमध्ये आधीपासून असलेले पर्यायही आहेत आणि आता नवीन मॉडेल्समध्ये नवीन घटक पाहायला मिळणार आहेत.
New Ertiga आणि XL6 ची वैशिष्ट्येनवीन Ertiga मध्ये किरकोळ अंतर्गत आणि बाह्य बदल केले जातील. ही कार आता 1.5-लीटर पेट्रोल इंजिन ऑफर करणार आहे, जी 105bhp पॉवर आणि 6-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर गिअरबॉक्स देणार आहे, तर कंपनी XL 6 मध्ये 6 आणि 7 सीट पर्याय मिळवू शकते.