शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
2
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
3
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
4
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
5
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
6
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
7
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
8
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
9
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
10
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
11
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
12
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
13
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
14
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
15
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
16
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
17
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
18
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
19
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
20
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट

इंधन दरवाढीचा वाहन विक्रीला फटका; आठ टक्क्यांनी घसरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2022 6:02 AM

तीनचाकी-व्यावसायिक वाहनांना पसंती. वाहन वितरकांची संघटना ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) ही माहिती जारी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : पेट्रोल, डिझेलच्या किमती सतत वाढत असल्याने तसेच सीएनजीच्या किमतीत ऐतिहासिक वाढ झाल्याने त्याचा वाहन विक्रीला फटका बसला आहे. प्रवासी वाहने, दुचाकी वाहने आणि ट्रॅक्टर यांच्या नोंदणीत झालेल्या घसरगुंडीमुळे जुलैमध्ये वाहनांच्या किरकोळ विक्रीत वार्षिक आधारावर ८% घट झाली आहे.

वाहन वितरकांची संघटना ‘फेडरेशन ऑफ ऑटोमोबाइल डीलर्स असोसिएशन’ने (फाडा) ही माहिती जारी केली आहे. त्यानुसार, जुलै २०२२मध्ये वाहनांची एकूण किरकोळ विक्री १४,३६,९२७ इतकी राहिली. जुलै २०२१मध्ये हा आकडा १५,५९,१०६ होता. प्रवासी वाहनांची विक्री ५ टक्क्यांनी घटली. या महिन्यात २,५०,९७२ प्रवासी वाहने विकली गेली. 

दुचाकीला किती फटका? n जुलै २०२२मध्ये दुचाकी वाहनांची विक्री ११%नी घटून १०,०९,५७४ वाहनांवर आली. n गतवर्षी ११,३३,३४४ दुचाकी वाहने विकली गेली. जुलै २०२२मध्ये ५९,५७३ ट्रॅक्टर विकले गेले. n जुलै २०२१मध्ये ८२,४१९ ट्रॅक्टर्सची विक्री झाली होती. ट्रॅक्टर विक्रीतील घसरण २८% आहे.

कोणत्या वाहनांची विक्री वाढली? जुलै २०२२मध्ये तीनचाकी आणि व्यावसायिक वाहनांची विक्री अनुक्रमे ८० टक्के आणि २७ टक्के वाढली आहे. या महिन्यात ५०,३४९ तीनचाकी, तर ६६,४५९ व्यावसायिक वाहने विकली गेली.

कधी वाढणार विक्री?  नागपंचमीपासून सणासुदीचा हंगाम सुरू झाला आहे. या काळात वाहनांची विक्री वाढेल, अशी अपेक्षा ‘फाडा’ने व्यक्त केली आहे.जुलैमध्ये विक्रीचे आकडे घटले असले तरी वाहनांची नवनवी मॉडेल बाजारात उतरविली जात आहेत. विशेषत: कॉम्पॅक्ट एसयूव्ही श्रेणीत वृद्धीमुळे नवे मॉडेल आणण्यात मदत मिळत आहे.    - विंकेश गुलाटी, अध्यक्ष, फाडा 

टॅग्स :Fuel Hikeइंधन दरवाढ