काही वर्षांपूर्वी ग्लोबल एनकॅपच्या सीईओंनी मारुतीला फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग असलेल्या कार निर्माण करून दाखवा असे आव्हान दिले होते. भारतातील पहिल्याच कारला फाईव्ह स्टार रेटिंग मिळालेले, या कारच्या लाँचिंगला ते आले होते. मारुतीने अखेर आपल्या एका कारला फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळवून दाखविले आहे.
मारुतीची कार डिझायरचे चौथे जनरेशन येऊ घातले आहे. ही कार ११ नोव्हेंबरला लाँच केली जाणार आहे. या कारचे फोटोही व्हायरल होत आहेत. अशातच या कारला ग्लोबल एनकॅपमध्ये फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग मिळाले आहे. कॉम्पॅक्ट सेदानमधील ही सर्वाधिक विक्री असलेली कार आहे.
मारुतीच्या स्विफ्टला जपान एनकॅपमध्ये ४ स्टार सेफ्टी रेटिंग मिळालेले आहे. जुनी ब्रेझा सोडली तर मारुतीच्या एकाही कारला चांगेल रेटिंग मिळत नव्हते. परंतू, आता मारुतीलाही फाईव्ह स्टार रेटिंग कसे मिळवायचे याचे कोडे उलगडले आहे. यामुळे आता हा बदल इतर कारमध्येही दिसण्याची शक्यता आहे.
G-NCAP Crash Test मध्ये जी कार पाठविण्यात आली होती ती भारतीय बाजारासाठी बनविण्यात आली होती. या टेस्टमध्ये मोठ्यांच्या सुरक्षेसाठी ५ स्टार आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ४ स्टार मिळाले आहेत. मोठ्यांसाठी ३४ पैकी ३१.२४ गुण आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी ४९ पैकी ३९.२० गुण देण्यात आले आहेत.
नवीन जनरेशन डिझायर सुरक्षा वैशिष्ट्यांसह लॉन्च केली जाणार आहे. सहा एअरबॅग्ज, इंजिन इमोबिलायझर, हाय स्पीड वॉर्निंग अलर्ट, थ्री पॉइंट सीट बेल्ट, सुझुकी हार्टेक्ट बॉडी, ईएसपी, हिल होल्ड असिस्ट, एबीएस, ईबीडी, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, आयएसओफिक्स चाइल्ड अँकरेज, प्री-टेन्शनर आणि फोर्ससह फ्रंट सीट बेल्ट देण्यात आलेला आहे.