मुंबई- मारुती सुझुकीची बहुप्रतीक्षित कार एर्टिगा एमपीव्ही 21 नोव्हेंबरला भारतीय बाजारात दाखल झाली आहे. या कारमध्ये अनेक जबरदस्त फीचर्स देण्यात आले आहेत. त्यामुळे ही कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना या अत्याधुनिक एर्टिगामध्ये नवनवे फीचर्स मिळणार आहेत. विशेष म्हणजे मारुतीच्या या नव्या एर्टिगामध्ये बऱ्याच एक्ससरीज देण्यात आल्या आहेत. या कारमध्ये अँबिशिअर आणि इंडल्ग असे दोन प्रकार उपलब्ध करून दिले आहेत. तसेच ग्राहकांना स्वतःच्या आवडीनुसार या नव्या एर्टिगामध्ये एक्ससरीज दिल्या आहेत.या अत्याधुनिक एर्टिगाच्या फीचर्समध्ये बॉक्स फिनिश लायनिंग सीट कव्हर्स, क्रोम इंसर्टसह बॉडी साइड मोल्डिंग, रिअर अप्पर स्पॉयलर, IRVMमध्ये रिव्हर्स पार्किंग असिस्ट, बंपर कॉर्नर प्रोटेक्टर्स, डिझायनर मेट्स, विंडो फ्रेम किट, स्टिअरिंग व्हील कव्हर आणि टिश्यू बॉक्सचा समावेश आहे. अक्सेसरीजमध्ये नॉटिकल स्टार फिनिश सीट कव्हर, गार्निश फिनिशबरोबर बॉडी साइड मोल्डिंग, रिअर बंपर गार्निश, विंडो फ्रेम किट, डिलक्स कार्पेट मॅट आणि मेपल वुड फिनिशिंगबरोबरच इंटिरिअर स्टायलिंग किंटचा समावेश आहे.या एर्टिगामध्ये 15 इंच अलॉय व्हील्स, व्हील कव्हर्स, एक्सटिरिअर स्टायलिंग किट, डोर सिल गार्ड, एल्युमिनेशनबरोबर डोर सिल गार्ड, फॉग लॅम्प गार्निश आणि 4 सेंसर्सबरोबरच रिव्हर्स पार्किंग अॅड, IRVM डिस्प्ले आणि कॅमेराही घेऊ शकता.एर्टिगामध्ये सेन्सरसह सिक्युरिटी सिस्टीम, नॉर्मल प्रीमियम बॉडी कव्हर्स, प्रीमियम आर्ट लेदर सीट कव्हर्स, डॅशबोर्डसाठी इंटीरियर स्टायलिंग किट, नंबर प्लेट गार्निश, 1000 वाटचा सब वूफर, कार परफ्युम आणि स्पीड गव्हर्नर अक्सेसरीज घेऊ शकता. मारुती एर्टिगानं 10 व्हेरिएंटच्या गाड्या लाँच केल्या आहेत.यात पेट्रोल इंजिन, मॅन्युअल ट्रान्समिशनचे चार व्हेरिएंट(LXi, VXi, ZXi आणि ZXi+) यांचा समावेश आहे. पेट्रोल इंजिन, एएमटीचे दोन व्हेरिएंट (VXi आणि ZXi) आणि डिझेल इंजिनचे चार व्हेरिएंट (LDi, VDi, ZDi व ZDi+)चाही समावेश आहे. मारुतीच्या नव्या एर्टिगाची किंमत 7.44 लाखांपासून सुरू होते. तसेच यातील टॉप व्हेरिएंट 10.90 लाख रुपयांना मिळतो.नव्या एर्टिगामध्ये 1.5 लीटरचं पेट्रोल इंजिन दिलं आहे. जे 6000rpmवर 105hpची पॉवर तर 4,400rpmवर 138Nm टॉर्क जनरेट करावं लागणार आहे. डिझेल व्हेरिएंट 1.3 लीटरचं इंजिन आहे, जे 4400rpmवर 90hpची पॉवर आणि 1,750rpmवर 200Nm टॉर्क जनरेट करतो.दोन्ही इंजिनमध्ये SHVS माइल्ड- हायब्रिड सिस्टीम आहे. ज्यात ड्युल बॅटरी मेकेनिजम देण्यात आलं आहे.
नव्या एर्टिगाचं ग्राहकांना गिफ्ट, जाणून घ्या एक्सेसरिजची पूर्ण लिस्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2018 9:26 PM