नवी दिल्ली : कावासाकी इंडियाने देशातील बाइक प्रेमींना मोठी भेट दिली आहे. कंपनीने नवीन कावासाकी निन्जा - 300 ( Kawasaki Ninja-300) लाँच केली आहे. या बाईकचे बुकिंग सुरू झाले आहे. एका तासात 200 किमी प्रवास करणे यासारख्या अनेक फिचर्ससह सुसज्ज आहे.
बाइक प्रेमींसाठी बाइकच्या किंमतीपेक्षा तिचे फिचर्स अधिक आकर्षणाचे कारण असते. हे लक्षात घेऊन कावासाकी इंडियाने निन्जा 2022 मॉडेलमध्ये ग्राफिक्स स्तरावर अनेक बदल केले आहेत. जुन्या मॉडेलपेक्षा ते अधिक बोल्ड आणि आकर्षक आहे. बाइकच्या सुरुवातीच्या मॉडेलची एक्स-शोरूम किंमत 3.37 लाख रुपये आहे. याआधी बाइकची किंमत 3.24 लाख होती. म्हणजेच नवीन मॉडेलसाठी ग्राहकांना 13,000 रुपये अधिक मोजावे लागतील.
कावासाकी निन्जा-300 ची खासियत- नवीन कावासाकी निन्जा - 300 लाइम ग्रीन, कँडी लाइम ग्रीन आणि एबोनी या तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. कँडी लाइम ग्रीन आणि एबोनी पेंट ऑप्शनमध्ये नवीन ग्राफिक्स आहेत.- कावासाकी निन्जा - 300च्या फेअरिंग आणि फ्यूल टाकीवर नवीन ग्राफिक्स आहेत. बाइकच्या इंजिनमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.- BS6 296cc, पॅरेलल-ट्विन, लिक्विड-कूल्ड इंजिन देण्यात आले आहे.- हे इंजिन 38.4bhp पॉवर आणि 27Nm पीक टॉर्क निर्माण करते.- इंजिनमध्ये सहा-स्पीड गिअरबॉक्स आहे. कमाल वेग 192 किलोमीटर प्रति तास आहे. शून्य ते 100 किमीचा वेग, ही 6.6 सेकंदात वाढवेल.