यंदाचा फादर्स डे उद्या, १८ जूनला साजरा केला जाणार आहे. तुमच्या वडिलांकडे १०-१५ वर्षे झालेली, जुनी स्कूटर किंवा बाईक असणार आहे. कारण त्यांनी त्यांच्या इच्छा, आकांक्षा तुमच्या शिक्षणासाठी, लाडांसाठी गुंडाळून ठेवल्या होत्या. या कर्तव्यांची परतफेड आयुष्यात कधीही होऊ शकत नाही. परंतू, आज तुम्ही त्यांना इलेक्ट्रीक स्कूटर्स भेट देऊ शकता.
हिरो इलेक्ट्रिक फोटॉन एलपी किंमत – ८६,३९१ रूपये हिरो इलेक्ट्रिक फोटॉन ही एक व्हेरिएण्ट व तीन रंगांमध्ये येते. या स्कूटरमध्ये १२०० वॅट मोटर लावलेली आहे. फोटॉन दोन ड्राइव्ह मोड्स: पॉवर व इकोनॉमी असलेली हाय-स्पीड स्कूटर आहे, जी ४५ किमी/तासची अव्वल गती प्राप्त करते. ही स्कूटर संपूर्ण चार्ज असल्यास पॉवर मोडमध्ये जवळपास ५० किमीपर्यंत आणि इकोनॉमी मोडमध्ये ८० किमीपर्यंत अंतर पार करते. या स्कूटरमध्ये पॉलिकार्बोनेट हेडलॅम्प, फ्रण्ट टेलिस्कोप सस्पेंशन, फ्रण्ट डिस्क ब्रेकआणि अॅण्टी-थेफ्ट अलार्म आहे.
ओडीसी हॉक किंमत – ९९,४०० रूपये इलेक्ट्रिक स्कूटर हॉक क्रूझ कंट्रोल असलेली भारतातील पहिली इलेक्ट्रिक स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये शक्तिशाली मोटर व कीलेस इलेक्ट्रिक स्टार्ट सिस्टम आणि पोर्टेबल बॅटरी आहे. ही स्कूटर २ व्हेरिएण्ट्स हॉक लाइट व हॉक प्लससह येते आणि ट्रान्स मॅट ब्ल्यू, इंटेन्स रेड, ग्रॅव्हिटी ग्रे, मिरेग व्हाइट व चारकोल ब्लॅक अशा रंगांत येते. बॅटरी ४ तासांमध्ये संपूर्ण चार्ज होते आणि प्रतिचार्ज १७० किमीची रेंज देते. या स्कूटरमध्ये ब्ल्यूटूथ कनेक्टीव्हीटी, अॅडजस्टेबल ब्रेक लेव्हर, मोबाइल चार्जर पॉइण्ट, म्युझिक सिस्टम, डिजिटल स्पीडोमीटर असण्यासोबत मोठी बूट स्पेस आहे. स्कूटर तीन वर्षांच्या वॉरंटीसह येते.
हिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स २.० किंमत – १,०७,००० रूपयेहिरो इलेक्ट्रिक ऑप्टिमा सीएक्स २.० पसंतीची ईव्ही आहे. १.०७ लाख रूपये किंमत असलेली ही स्कूटर एका रंग पर्यायामध्ये उपलब्ध आहे. स्कूटरमध्ये २ केडब्ल्यूएच बॅटरी आहे, जी एका चार्जमध्ये ८९ किमी/चार्ज रेंज देते. विश्वसनीय ब्रेकिंग व सस्पेंशन सिस्टमसह ऑप्टिमा सीएक्स २.० सुलभ ड्रायव्हिंग अनुभव देते.
ओकिनावा रिज १०० किंमत – ११५,३११ रूपये ओकिनावा रिज १०० एक व्हेरिएण्ट व तीन रंगांमध्ये येते. या स्कूटरमध्ये शक्तिशाली ८०० वॅट मोटर आणि इलेक्ट्रॉनिकली असिस्टेड ब्रेकिंग सिस्टमसह फ्रण्ट व रिअर ड्रम ब्रेक्स आहेत. १४९ किमीच्या रेंज मिळते. सेंट्रल लॉकिंग, अॅण्टी-थेफ्ट सिस्टम, जिओ-फेन्सिंग, इमोबिलायझेशन, पार्किंग असिस्टण्स, ट्रॅकिंगव मॉनिटरिंग. ही स्कूटर जवळपास पाच ते सहा तासांत संपूर्ण चार्ज होते आणि ५० किमी/तासची अव्वल गती देते.
ओला एस१ किंमत – १,२९,९९९ रूपये ओला एस१ इलेक्ट्रिक स्कूटर ओला एस१ आणि ओला एस१ प्रो या दोन व्हेरिएण्ट्समध्ये उपलब्ध आहे. दोन्ही मॉडेल्समध्ये कॉम्पॅक्ट डिझाइनसह ट्विन-पॉड हेडलाइट्स, एलईडी डीआरएल रिंग, स्लीक इंडिकेटर्स, एैसपैस स्टोरेज आणि विविध रंग पर्याय आहेत. ८.५ केडब्ल्यू मोटरची शक्ती असलेली ओला एस१ ९० किमी/तासची अव्वल गती प्राप्त करते आणि प्रतिचार्ज १२१ किमीची रेंज देते, तर ओला एस१ प्रो ११५ किमी/तासची अव्वल गती प्राप्त करते आणि प्रतिचार्ज १८१ किमीची रेंज देते.