भारतात वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. दरवर्षीचे खपाचे आकडेही काही लाखांत जात आहेत. भारतात वाहनांची एवढी संख्या झालीय की जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक वाहने असलेला देश जपानला मागे टाकले आहे. सेमीकंडक्टर चिपच्या टंचाईतदेखील २०२२ मध्ये ४२.५ लाख वाहने विकली गेली आहेत.
आता चीन आणि अमेरिकेनंतर सर्वाधिक वाहनांची संख्या भारतात आहे. कोरोना काळानंतर भारतात खासगी वाहनांची मोठी मागणी झाली आहे. SIAM वाहनांच्या विक्रीचे आकडे दर तीन महिन्य़ाला जारी करते. अद्याप ऑक्टोबरच्या तिमाहीचे आकडे जारी केलेले नाहीत.
बिझनेस स्टँडर्डमधील एका अहवालानुसार, टाटा मोटर्स सारख्या कंपन्या कंपन्या आपल्या विक्रीच आकडे जाहीर करतात. देशातील सर्वात मोठी प्रवासी कार कंपनी मारुती सुझुकी इंडिया (मारुती सुझुकी इंडिया) ने डिसेंबरमध्ये 113,535 कार विकल्या. गेल्या वर्षी भारतातील विक्रीचा आकडा 42.5 लाख युनिट्सच्या पुढे गेला आहे. गेल्या वर्षी जपानमध्ये 4.2 दशलक्ष वाहने विकली गेली. हा आकडा भारतापेक्षा 5.6 टक्क्यांनी कमी आहे.
चीन ही जगातील सर्वात मोठी वाहन बाजारपेठ आहे. गेल्या वर्षी चीनमध्ये 2.67 कोटी वाहने विकली गेली आहेत. अमेरिकेत 1.38 कोटी वाहने विकली गेली आहेत. हा आकडा भारतापेक्षा खूप अधिक असला तरी अमेरिकेला मागे टाकण्यासाठी भारताला पुढील काही वर्षे लागण्याचा अंदाज आहे. चीन आणि अमेरिकेमध्ये इलेक्ट्रीक गाड्यांची विक्री मोठ्या प्रमाणावर होते. याचा फायदा त्यांना होत आहे. पुढील चार-पाच वर्षांत भारतातही इलेक्ट्रीक वाहनांच्या किंमती पेट्रोल गाड्यांएवढ्या येणार असल्याचे गडकरी सांगत आहेत.
2021 मध्ये चीनमध्ये 2.627 कोटी वाहने विकली गेली, तर चीनमध्ये 1.54 कोटी आणि जपानमध्ये 44.4 कोटी वाहने विकली गेली. कोरोनामुळे चीनची अर्थव्यवस्था डगमगू लागली आहे. यामुळे यंदा चीनला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. याचा फायदा अमेरिकेला होण्याची शक्यता आहे.