Honda Elevate At CSD Stores : नवी दिल्ली : होंडाकार्स इंडियाची (Honda Cars India) लेटेस्ट एसयूव्ही –एलिव्हेट आता कँटीन स्टोअर डिपार्टमेंटमध्ये (CSD) देखील मिळणार आहे. भारतीय लष्करातील जवान आणि त्यांचे कुटुंबीय नवीन एलिव्हेट मिड साइड एसयूव्ही देशभरातील कँटीन स्टोअर डिपार्टमेंटमधून खरेदी करू शकतात, अशी घोषणा होंडाकार्स इंडियाने केली आहे.
फक्त एलिव्हेटच नाही तर कँटीन स्टोअर डिपार्टमेंटमध्ये होंडा सिटी आणि अमेझ कॉम्पॅक्ट सेडान देखील मिळणार आहेत. याबाबात होंडा कार्स इंडिया लिमिटेडचे उपाध्यक्ष (मार्केटिंग आणि सेल्स) कुणाल बहल म्हणाले, "आमच्या जवानांसाठी होंडा एलिव्हेटची उपलब्धता वाढवणे ही आमच्यासाठी सौभाग्याची गोष्ट आहे. या उपक्रमामुळे आपल्या देशाची सेवा करणाऱ्यांना उच्च दर्जाची होंडा उत्पादने उपलब्ध करून त्यांना पाठिंबा देण्याची आमची बांधिलकी अधिक मजबूत होईल"
इंजिन आणि ट्रान्समिशनहोंडा एलिव्हेट मिड-साइज एसयूव्हीमध्ये 1.5-लिटर 4-सिलिंडर नॅच्युरली एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे, जे 121PS पॉवर आणि 145Nm टॉर्क जनरेट करते. यात 6-स्पीड मॅन्युअल आणि 7-स्पीड CVT ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा ऑप्शन देण्यात आला आहे. याचबरोबर, होंडा एलिव्हेटची लांबी 4312mm, रुंदी 1790mm आणि उंची 1650mm आहे. तसेच या कारचा व्हीलबेस 2650mm आहे. याशिवाय, एसयूव्हीचा ग्राउंड क्लीयरन्स 220mm आहे, जो या सेगमेंटमध्ये सर्वाधिक आहे. ही कार चार वेगवेगळ्या SV, V, VX आणि ZX अशा ट्रिममध्ये येते.
ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंस सिस्टीमसह इतर फीचर्सहोंडा एलिव्हेट मिड-साइज एसयूव्हीच्या टॉप मॉडेलमध्ये अनेक चांगले फीचर्स आहेत. यात ॲडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टंस सिस्टीम (ADAS) आहे, ज्यामध्ये ॲडॉप्टिव्ह क्रूझ कंट्रोल, लेन असिस्ट, ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग यासारख्या फिचर्सचा समावेश आहे. याशिवाय, इतर फीचर्समध्ये 10.25 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कारप्ले, लेदरेट अपहोल्स्ट्री, 8-स्पीकर साउंड सिस्टम, ऑटो-डिमिंग IRVM आणि क्रोम डोअर हँडल्स देण्यात आले आहेत.