भारत सरकारने एका अशा निर्णयाला मान्यता दिली आहे, ज्याचा फायदा थेट ट्रक ड्रायव्हर्सना होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे त्यांचा प्रवास आता कुठल्याही ऋतूत सुखकर होईल, विशेषतः उन्हाळ्यात. यासंदर्भात, खुद्द रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी माहिती दिली आहे
नितिन गडकरी म्हणाले, सरकारने एन2 आणि एन3 कॅटेगिरीच्या ट्रकमध्ये एअर कंडीशनर अनिवार्य करणाऱ्या ड्राफ्ट नोटिफिकेशनला मंजुरी दिली आहे. यामुळे, आता ट्रक तयार करणाऱ्या सर्व कंपन्यांना संबंधित श्रेणीच्या ट्रकमध्ये एसी देणे अनिवार्य झाले आहे. यानंतर ट्रक ड्रायव्हरचा प्रवास सुलभ होण्यास मदत होईल.
रस्ते सुरक्षितता वाढेल - रस्त्यांच्या सुरक्षिततेत ट्रक ड्रायव्हर्सची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. सरकारच्या या निर्णयामुळे ट्रक ड्रायव्हर्सचा प्रवास आरामदायक होण्यास मदत मिळेल. यामुळे त्यांची काम करण्याची क्षमता वाढेल. तसेच, थकव्यामुळे होणारी समस्या दूर होईल. यामुळे हा निर्णय एक महत्वाचा निर्णय सिद्ध होईल.
एन-2 आणि एन-3 कॅटेगिरी म्हणजे? -- एन-2 : या कॅटेगिरीत येणाऱ्या ट्रकचे एकूण वजन 3.5 टन पेक्षा अधिक आणि 12 टन पेक्षा कमी असते.- एन-3 : या कॅटेगिरीत येणाऱ्या ट्रकचे वजन 12 टनहून अधिक असते.