शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
2
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
3
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
4
“दिल्लीत मोदींचे सरकार तयार झाले नसते, ४०० पार सांगत होते पण...”; शरद पवारांचे सूचक विधान 
5
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
6
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
7
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
8
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
9
महाविकास आघाडीचे जागावाटप ठरले? काँग्रेस १०० जागा, तर ठाकरे शिवसेना, पवार गट एवढ्या जागा लढविणार
10
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय
11
'३४ वर्ष वाट पाहिली अन्..'; 'लापता लेडीज'ची ऑस्कर २०२५ मध्ये एन्ट्री होताच रवी किशन भावुक
12
Nicholas Pooran ला तोड नाही; कॅरेबियन गड्यानं सेट केला षटकारांचा 'महा-रेकॉर्ड'
13
Video : रस्त्यावरील खड्ड्याने केंद्रीय मंत्र्याचीच केली फजिती, शिवराज सिंह चौहानांचा व्हिडीओ व्हायरल
14
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
15
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
16
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
17
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
18
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
19
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
20
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य

आता कारच्या प्रत्येक सीटसाठी 'सीट-बेल्ट अलार्म' बंधनकारक; अपघाताच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2022 2:45 PM

कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास आता अलार्म वाजू लागेल. सध्या बहुतांश कारमध्ये मागील सीट बेल्टला अलार्म सिस्टम जोडलेलं नाही, फक्त काही लक्झरी कारमध्ये मागील सीट बेल्ट अलार्म सिस्टम बसविल्या जातात.

कारच्या मागील सीटवर सीट बेल्ट न लावल्यास आता अलार्म वाजू लागेल. सध्या बहुतांश कारमध्ये मागील सीट बेल्टला अलार्म सिस्टम जोडलेलं नाही, फक्त काही लक्झरी कारमध्ये मागील सीट बेल्ट अलार्म सिस्टम बसविल्या जातात. पण आता सरकारनं नवा नियम जारी करून कार कंपन्यांना वाहनाच्या सर्व सीटवर सीट बेल्ट अलार्म लावणं बंधनकारक केलं आहे. याशिवाय ओव्हर स्पीडिंगसाठी स्पीड अलर्ट सिस्टीम आणि सेंट्रल लॉकिंग सिस्टिमसाठी मॅन्युअल ओव्हरराइड सिस्टीमही कारमध्ये बसवावी लागणार आहे. अपघात झाल्यास कारची यंत्रणा बिघडते आणि अनेक घटनांमध्ये प्रवासी गाडीतच अडकून पडल्याचं दिसून आलं आहे. मॅन्युअल ओव्हरराइड सिस्टम अशा परिस्थितीत वाहनाचा एक दरवाजा उघडेल.

रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने जारी केलेल्या मसुद्यावर तुम्हीही तुमचं मत नोंदवू शकणार आहात. मत नोंदवण्याची शेवटची तारीख ५ ऑक्टोबर २०२२ अशी आहे. टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्री यांचा रस्ते अपघातात मृत्यू झाल्यानंतर मागील सीटशी संबंधित नियमातील सर्व बदलांबाबत गांभीर्यानं विचार केला जात आहे. 

जागतिक बँकेने गेल्या वर्षी एका अहवालात म्हटले होते की, रस्ते अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांची संख्या सर्वाधिक असलेल्या देशांमध्ये भारताचा समावेश होतो. अहवालानुसार, देशात रस्ते अपघातात दर चार मिनिटाला एका व्यक्तीचा मृत्यू होतो. भारतातील वाहनांची संख्या जगाच्या तुलनेत केवळ १ टक्‍के असताना, आश्‍चर्यकारकरीत्या रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दहापट आहे.

भारतात कारमधील सर्व प्रवाशांना सीट बेल्ट लावणं बंधनकारक आहे आणि तसं न केल्यास दंड आकारण्याचाही नियम आहे. असं असूनही मागील सीटवर बसलेले बहुतांश लोक सीट बेल्ट घालत नाहीत. यामध्ये प्रशासनाच्या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नाही हेही एक मोठं कारण आहे. त्यामुळेच कारमध्ये सीट बेल्ट अलार्म अनिवार्य करण्याऐवजी सरकारनं सीट बेल्ट घालण्यासंबंधीचे नियम कडक करावेत, अशी कार कंपन्यांची मागणी आहे. त्यात वाढ झाली असून काही ठिकाणी वाहतूक पोलिस नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी करत आहेत. मोटार वाहन कायद्यांतर्गत सीट बेल्ट न लावल्यास हजार रुपये दंड आकारण्याची तरतूद आहे.

टॅग्स :Automobile Industryवाहन उद्योगAccidentअपघात