पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे अनेक जण आता अन्य पर्यायांकडे वळू लागले आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांमध्ये देशात इलेक्ट्रीक वाहनांची (Electric Vehicles) विक्री वाढू लागली आहे. अनेक कंपन्या सध्या इलेक्ट्रीक गाड्या लाँच करण्याच्या प्रयत्नात आहेत. सध्या बाजारातही हळूहळू अनेक पर्याय उपलब्ध होऊ लागलेत. आज आपण ग्रेवटन मोटर्सच्या Gravton Quanta इलेक्ट्रीक टू व्हिलर्सबाबत माहिती देणार आहोत. केवळ 80 रुपयांत ही बाईक 800 किमीपर्यंत चालेल असा दावा कंपनीनं केला आहे.
कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार Gravton Quanta इलेक्ट्रीक बाईक 100 किलोमीटर चालवण्यासाठी 10 रुपयांचा खर्च येणार आहे. यामध्ये कंपनीनं 3kWh Li-ion बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जमध्ये बाईक १५० किलोमीटरपर्यंत जाऊ शकते. यामध्ये एकत्र दोन बॅटरी ठेवण्यासाठीही एक विशेष सुविधा देण्यात आली आहे. याचाच अर्थ एका चार्जिंगमध्ये तुम्ही 320 किमीपर्यंत जाऊ शकता.
70 kmph आहे टॉप स्पीड ही बाईक एकून तीन रंगांमध्ये उपलब्ध असेल. ब्लॅक कलरची स्पेशल एडिशन म्हणून विक्री केली जाईल. याच्या लिमिटेड युनिट्सचीच विक्री करण्यात येईल. ग्राहकांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवरुन या बाईकचं बुकिंग करता येईल. या बाईकमध्ये 3KW ची BLDC मोटर देण्यात आली आहे. ही मोटर 170Nm चा टॉर्क जनरेट करते. या बाईकचा सर्वाधिक वेग 70Kmph आहे.
फास्ट चार्जिंगच्या माध्यमातून या बाईकची बॅटरी ही 90 मिनिटांमध्ये फुल चार्ज होते. सामान्य मोडमध्ये चार्ज होण्यासाठी या बाईकला तीन तासांचा कालावधी लागतो. Gravton Quanta बॅटरीवर पाच वर्षांची वॉरंटी आणि रिप्लेसमेंट अश्योरन्ससह उपलब्ध आहे. या बाईकमध्ये कंपनीनं 17 इंचाचे व्हिल्स, डिस्क ब्रेक, डिजिटल डॅशबोर्ड, ऑल LED सारखे फिचर्सही दिली आहेत. तसंच Quanta Smart अॅपद्वारे ही बाईक कनेक्ट केली जाऊ शकते. यामध्ये ग्राहकांना रोडसाईड असिस्टंस, मॅपिंग सर्व्हिस स्टेशन, रिमोट लॉक/अनलॉक, लाईट बंद सुरू करण्यासारख्याही सुविधा मिळतात.