मुंबई – सध्या देशभरात ओला इलेक्ट्रिक स्कूटरची(OLA Electric Scooter) जोरदार चर्चा सुरू आहे. अद्याप ओलाची ही स्कूटर देशात लॉन्चदेखील झाली नाही परंतु ओला इलेक्ट्रिकनं लॉन्चपूर्वीच सोशल मीडियातून याचा धमाकेदार जाहिरातीला सुरुवात केली आहे. त्यामुळे या स्कूटरकडून लोकांची अपेक्षा वाढली आहे. ट्विटरद्वारे ओलाने ओला इलेक्ट्रिक स्कूटरसाठी बुकींग सुरुवात करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे लवकरच ओलाची इलेक्ट्रिक स्कूटर भारतीय बाजारात दाखल होण्याचे संकेत आहेत.
ओला इलेक्ट्रिक स्कूटरचं बुकींग किंमत फक्त ४९९ इतकी ठेवली आहे. ही रक्कम पूर्णपणे रिफंडेबल असणार आहे असं ओलानं जाहीर केले आहे. म्हणजे ग्राहक जर बुकींग कॅन्सल करतील तर त्याला पूर्ण पैसे परत केले जातील. ओला इलेक्ट्रीक वेबसाईटवर जाऊन त्याची बुकींग करू शकतात. त्यासाठी इच्छुक खरेदीदारांना वेबसाईटवर पहिल्यांदा स्वत:चं अकाऊंट बनवावं लागेल त्यानंतर स्कूटर बुकींग करू शकता. पहिल्यांदा बुकींग करणाऱ्या ग्राहकांना डिलिवरीसाठी प्राधान्य दिलं जाईल असं OLA नं म्हटलं आहे.
अद्याप कंपनीने स्कूटरबाबत कोणत्याही स्पेसिफिकेशंसची घोषणा केली नाही. परंतु ज्यापद्धतीने कंपनीने सोशल मीडियावर पोस्ट करत सांगितलंय की, ही फक्त सुरुवात आहे. स्कूटरची ड्रायव्हिंग रेंज, चार्जिंग टाइमसह स्कूटर डिलिवरी टाइमलाइन आणि स्पेसिफिकेशंस याबाबत अधिक माहिती लवकरच दिली जाणार आहे. ओला इलेक्ट्रिकचे सीईओ यांनी इलेक्ट्रिक स्कूटरचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. ओला इलेक्ट्रिक लवकरच भारतात त्यांची पहिली स्कूटर लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. भारतीय दुचाकी बाजारात इलेक्ट्रिक स्कूटरची आतुरतेने वाट पाहिली जात आहे. या महिन्याच्या अखेरपर्यंत स्कूटरच्या किंमतीची घोषणा करण्यात येईल. ही एथर एनर्जी Ather 450x सारख्या इलेक्ट्रिक स्कूटरला टक्कर देईल.
५० मिनिटांत ७५ किमी चार्जिंग
कंपनीच्या चार्जर नेटवर्कचा वापर करून ओला स्कूटर फक्त १८ मिनिटांत ५० टक्के चार्ज होऊ शकते. त्यानंतर जवळपास ७५ किमी अंतर पार करता येईल. ओला स्कूटरच्या खरेदीसोबत घरात चार्ज करण्यासाठी एक होम चार्जर युनिटही दिला जाईल.
कसं कराल बुकींग?
OLA च्या वेबसाईटवर जाऊन सर्वप्रथम तुम्हाला रजिस्टर करावं लागेल. यासाठी मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ओटीपी येईल. एकदा लॉगइन झाल्यानंतर ईमेल आयडी रजिस्टर करून तुम्ही बुकींग करू शकाल. तर पेमेंट UPI किंवा ATM कार्डद्वारे करू शकता.