देशातील एक मुख्य इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनी असलेल्या वर्टस मोटर्सने (Virtus Motors) अपल्या इलेक्ट्रिक सायकलचे नवी Alpha सीरीज लॉन्च केली आहे. यात दोन इलेक्ट्रिक सायकलचा समावेश करण्यात आला आहे. या सायकलींना 'Alpha A' आणि 'Alpha I' अशी नावे देण्यात आली आहेत. ही सायकल पारंपरिक आणि इलेक्ट्रिक सायकलमधील गॅप भरून काढण्यास मदत करेल, असादावा कंपनीने केला आहे.
Alpha सीरीजमध्ये काय आहे खास? -या दोन्ही इलेक्ट्रिक सायकलला 8.0 Ah क्षमतेचा फिक्स्ड बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हिच्या समोरच्या बाजूला डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. तसेच, हिचे सिंगल-स्पीड डिझाइन कुठल्याही प्रकारच्या रोडवर चांगली राइड देते, असा दावाही कंपनीने केला आहे. याच बरोबर, या सायकलला बरेच यूजर फ्रेंडली फीचर्सदेखील देण्यात आले आहेत. जे हिला आणखी उत्कृष्ट बनवतात. या सायकलला 1 इंचाचे LCD स्क्रीनही देण्यात आले आहे. जे थ्रोटल जवळ लावण्यात आले आहे. यावर रियल टाइम इंफॉर्मेशन मिळते.
बॅटरी आणि परफॉर्मन्स - या इलेक्ट्रिक सायकलमध्ये कंपनीने 36V 8AH च्या बॅटरी पॅकसह 250W क्षमतेची इलेक्ट्रिक हब मोटर देण्यात आली आहे. एकदा पूर्णपणे चार्ज केल्यानंतर, ही सायकल 30 किमी पर्यंत चालते. तसेच पॅडल सपोर्टसह हिची रेन्ज वाढून 60 किमीपर्यंत जाते. या सायकलची टॉप स्पीड 25 किलोमीटर प्रति तास आणि हिचे वजन केवळ 20 किलोग्रॅम एवढे आहे. या सायकलला ट्यूब टायर, पुढच्या आणि मागच्या बाजूला डिस्क ब्रेक्स, MTB फ्रेम आणि इनबिल्ट बॅटरी पॅक देण्यात आला आहे. हिच्या डिस्प्लेवर बॅटरी लेव्हल, ऑडोमीटर, स्पीडोमीटरसारखी माहिती मिळते.
किंमत आणि व्हेरिअंट्स -कंपनीने ही सायकल आपल्या 7 व्या वर्धापन दिनानिमित्त लॉन्च केली आहे. यामुळे ती विशेष किंमतीत दिली जात आहे. हिची मूळ किंमत 24,999 रुपये एवढी आहे. मात्र, सुरुवातीच्या 50 ग्राहकांना ही सायकल केवळ 15,999 रुपयांना मिळेल. यानतंर, पुढील 100 ग्राहकांसाठी 17,999 रुपये निर्धारित करण्यात आली आहे. तसेच, स्पेशल डिस्काउंटदरम्यान ही सायकल 19,999 रुपयांना मिळेल. ही सायकल दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात ग्रे आणि ब्ल्यू कलरचा समावेश आहे. ही सायकल कंपनीच्या आधिकृत वेबसाइटवरून बूक केली जाऊ शकते.