शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

GST E Way Bill: ट्रक, टेम्पो चालक-मालकांनो! दिवसाला 200 किमींचे अंतर कापावेच लागणार, नाहीतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 1:33 PM

GST E Way Bill: ई वे बिल प्रणालीमध्ये केलेला बदल हा 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. त्यापूर्वी ई वे बिल १०० किलोमीटर प्रतिदिन याप्रमाणे तयार केले जात होते.

वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) मधील ई वे बिल प्रणालीमध्ये (GST E Way Bill system) मोठा बदल करण्यात आला आहे. यामध्ये आधीचे 100 किमीचे अंतर आता दुपटीने वाढविण्यात आल्याने वाहन चालकांना त्रासदायक ठरणार आहे. कारण त्यापेक्षा जास्त वेळ लागल्यास जुने ई वे बिलाची व्हॅलिडिटी संपणार आहे. यामुळे एकदा का वाहन निघाले आणि 24 तासांत 200 किमीचे अंतर कापले नाही तर मोठा दंड भरावा लागणार आहे. (The validity of e-way bill under Rule 138(10) of the CGST Rules has been amended, according to which the e-way bill will now be valid for 1 day for every 200 km of travel.)

ई वे बिल प्रणालीमध्ये केलेला बदल हा 1 जानेवारीपासून लागू झाला आहे. त्यापूर्वी ई वे बिल १०० किलोमीटर प्रतिदिन याप्रमाणे तयार केले जात होते. त्यानुसार प्रत्येक १०० किलोमीटरला एक दिवस वाढत जात असे, मात्र नव्या नियमात बदलानुसार १०० ऐवजी २०० किलोमीटर प्रतिदिन असे अंतर देण्यात आले आहे. एक हजार किलोमीटरकरिता या नियमानुसार पाच दिवस मिळत असून, त्याचा कालावधी संपला तर ऑनलाइन त्याचा कालावधी वाढवण्यात येत आहे. विशेष म्हणजे या तरतुदीमुळे गैरप्रकारांना आळा बसणार असला तरी यामुळे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक मात्र अडचणीत आला आहे. 

मालवाहतूक ट्रक किंवा टेम्पोमध्ये एकाच मालकाचा माल असल्यास हे शक्य होणार आहे. मात्र, अनेक दुकानदारांचा माल एकाच टेम्पोत असल्यास तो त्यांच्यापर्यंत पोहोच करणे व तेथून निघणे यासाठी खूप वेळ लागतो. वाहतूक कोंडी, बाजारपेठेत दिवसाची नो एन्ट्री, रात्रीची डिलिव्हरी केली तर दुकान बंद असणे, मालकाला बोलवून आणण्यास वेळ लागणे आदी गोष्टींमुळे 24 तासांत 200 किमीची अट खूपच अडचणीची आहे. याचा फटका ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांसह उद्योजकांनाही बसत आहे. तसेच रस्ते खराब असल्याने, वाहतूक कोंडीमुळे 24 तासांत 200 किमीचे अंतर कापणेही अशक्यप्राय आहे. अशात चालकांनी घाई केल्यास अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे ही वेगळीच. 

ई वे बिल कसे काम करते...जीएसटी कायद्यात मालवाहतूकदारांसाठी ‘ई-वे बिल’ ही संकल्पना आहे. त्याअंतर्गत एखाद्या ठिकाणाहून सामान घेऊन माल ट्रक किंवा टेम्पो निघाला की, ते वाहन कुठल्या प्रकारचे, किती सामान, कुठे घेऊन जाणार, याची ऑनलाइन नोंद करावी लागते. त्याआधारे जीएसटी विभागाकडून ‘ई-वे बिल’ दिले जाते. हे बिल घेऊन वाहन चालकाला प्रवास करावा लागतो. हे वाहन जीएसटी विभागाच्या गुप्तवार्ता विभागाचे अधिकारी रस्त्यात कोठेही अडवू शकतात. त्यावेळी ई-वे बिल दाखवणे अनिवार्य असते. २४ तासांत वाहन तिकडे पोहोचले नाही तर ई-वे बिल रद्द होते. मग पुन्हा कर परतावाही गेला व दुप्पट दंडाचा ससेमिरा मागे लागतो.

टॅग्स :GSTजीएसटीroad transportरस्ते वाहतूक