नवी दिल्ली : इलेक्ट्रिक वाहन स्टार्ट-अप जीटी फोर्सने दोन नवीन इलेक्ट्रिक स्कूटर्स GT Soul आणि GT One लाँच केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे, या स्कूटर्समध्ये तुम्हाला 60 ते 65 किमीपर्यंत रेंज ऑफर केली जाईल आणि त्यांची किंमत देखील 50 ते 60 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. GT Soul ची किंमत 49,996 रुपये (एक्स-शोरूम इंडिया) आहे, तर GT One ही 59,800 रुपयांत (एक्स-शोरूम इंडिया) लाँच करण्यात आली आहे.
GT Soul इलेक्ट्रिक स्कूटरGT Soul ही स्लो-स्पीड कॅटगरीची स्कूटर आहे. याचा वेग 25 किमी/तास आहे. तसेच, ही स्कूटर Lead 48V 28Ah आणि Lithium 48V 24Ah बॅटरी या दोन व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. GT Soul स्कूटर फुल चार्ज केल्यावर 60-65kms ची रेंज देते. याशिवाय, GT Soul ला लोडिंग क्षमता 130 किलो, सीटची उंची 760 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 185 मिमी आहे. यामध्ये सेंट्रल लॉकिंग, पार्किंग मोड आणि अँटी थेफ्ट अलार्मसह रिव्हर्स मोड यांसारखे फीचर्स आहेत. यात 18 महिन्यांची मोटर वॉरंटी, एक वर्षाची लीड बॅटरी वॉरंटी आणि तीन वर्षांची लिथियम-आयन बॅटरी वॉरंटी आहे.
GT One इलेक्ट्रिक स्कूटरGT Soul प्रमाणे GT One इलेक्ट्रिक स्कूटर देखील टॉप स्पीड 25km/h आहे. ही लीड 48V 24Ah आणि लिथियम 48V 28Ah बॅटरीमध्ये उपलब्ध आहे. GT One इलेक्ट्रिक स्कूटर एका फुल चार्जमध्ये 60 ते 65 किमी अंतर कापते. तसेच, ही हाय पॉवर असलेल्या ट्युब्युलर फ्रेमवर तया केली आहे आणि त्यात रायडरच्या आरामासाठी ड्युअल-ट्यूब टेक्नॉलॉजीसह फ्रंट हायड्रोलिक आणि टेलिस्कोपिक डबल शॉकरचा समावेश आहे. GT One ची लोडिंग क्षमता 140 किलोग्राम, सीटची उंची 725 मिमी आणि ग्राउंड क्लीयरन्स 155 मिमी आहे. यात अँटी थेफ्ट अलार्मसह सेंट्रल लॉकिंग, पार्किंग मोड, रिव्हर्स मोड, मोबाइल चार्जिंग आणि क्रूझ कंट्रोल सिस्टीम यांसारखी फीचर्स आहेत. तसेच, यात 18 महिन्यांची मोटर वॉरंटी, एक वर्षाची लीड बॅटरी वॉरंटी आणि तीन वर्षांची लिथियम बॅटरी वॉरंटी आहे.