शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live : आज मतदार सत्ताधारी, राज्यात ४ हजार १३६ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम मशिनमध्ये बंद होणार!
2
मुंबई, ठाण्यात ठाकरे, शिंदेंची प्रतिष्ठा पणाला! ठाकरे बंधूंच्या मतदारसंघांकडे लक्ष
3
नालासोपाऱ्यात कॅश ड्रामा! पैसे वाटपाच्या आरोपांवरून विनोद तावडेंना घेरले; तीन गुन्हे दाखल
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल!
5
टक्का वाढला पाहिजे..! सर्वोच्च अधिकार नाकारून कसे चालेल...?
6
Maharashtra Assembly elections 2024: कोणत्या मुद्द्यांभोवती फिरली प्रचारचक्रे ? 
7
विशेष लेख: ‘अर्बन नक्षल’- भाजपच्या मानगुटीवरचे भूत 
8
नरेंद्र मोदी, राहुल गांधी, ठाकरे करणार कोथरुडात मतदान; नामसाधर्म्यामुळे प्रशासनाची धावपळ
9
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान; काँग्रेस-भाजपमध्ये लढत 
10
झारखंड : दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला; अंतिम टप्प्याचे आज ३८ जागांवर मतदान
11
ज्यांच्या बळावर मतदान, त्यांचाच हिरावला अधिकार; दोन हजार पोलिसांचे बॅलेटच आले नाहीत
12
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
13
हल्ले, मारहाणीच्या घटनांनी राजकीय वातावरण तापले; प्रचारादरम्यान काय-काय घडलं?
14
३५ हजार पोलिसांचा फौजफाटा मुंबईत सज्ज; चार हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई
15
वरळीतील १,३३९ मतदारांच्या सोयीसाठी; चक्क उड्डाणपुलाखाली दोन मतदान केंद्रे
16
मतदान शांततेत पार पाडा, जबाबदारी निभावा; पोलिस महासंचालक संजय वर्मा यांचे आवाहन
17
सुप्रिया सुळे, नाना पटोलेंनी बिटकॉइन स्कॅम केला, निवडणुकीत परदेशी चलनाचा वापर; भाजपाचा आरोप
18
डहाणूचा बविआ उमेदवार भाजपात आला, त्याचाच राग ठाकूर पिता-पुत्रांनी काढला? चर्चांना उधाण
19
रोहित पवारांच्या कारखान्यातील अधिकाऱ्याला पैसे वाटताना पकडले; पोलिसात गुन्हा दाखल
20
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?

Happy New Year 2023 : पुढील वर्षात येत आहेत 3 स्वस्तातल्या इलेक्ट्रिक कार, एका कारला आताच मिळाली 20 हजार बुकिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 6:14 PM

Upcoming Electric Hatchback Car in 2023: एकट्या जानेवारी महिन्यातच 3 इलेक्ट्रिक हॅचबॅक कार बाजारात येणार आहेत.

भारतात इलेक्ट्रिक कारचे ऑप्शन्स दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. बहुतांश कंपन्यांचे लक्ष सध्या स्वस्तातील इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यावर आहे. भारतीय बाजारात 10 लाख रुपयांपेक्षा स्वस्तातील इलेक्ट्रिक कार सेगमेंटमध्ये बराच स्कोप आहे. 2022 मध्ये बऱ्याच इलेक्ट्रिक कार लॉन्च झाल्या. यानंतर आता 2023 मध्येही अनेक नवीन मॉडेल्स बाजारात येत आहेत. जानेवारी महिन्यापासूनच याला सुरुवात होणार आहे. एकट्या जानेवारी महिन्यातच 3 इलेक्ट्रिक हॅचबॅक कार बाजारात येणार आहेत.

Tata Tiago EV -टाटा मोटर्सने आपली सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार टियागो ईव्ही यापूर्वीच लॉन्च केली आहे. हिची डिलिव्हरी पुढील महिन्यात सुरू होईल. या इलेक्ट्रिक हॅचबॅकची किंमत 8.49 लाख रुपयांपासून ते 11.79 लाख रुपयांपर्यंत असेल. Tata Tiago EV ला दोन बॅटरी ऑप्शन्स आहेत. ही कार फूल चार्जमध्ये 315 किमीपर्यंत चालेल, असा दावा करण्यात येत आहे. महत्वाचे म्हणजे या कारला आतापर्यंत 20 हजार बुकिंगदेखील मिळाले आहे.

MG Air EV -एमजी आपली छोटू इलेक्ट्रिक कार MG Air EV देखील भारतात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. ही कार ग्रेटर नोएडामध्ये पुढील महिन्यात होणाऱ्या 2023 ऑटो एक्सपोमध्ये सादर केली जाऊ शकते. ही इंडोनेशियातील Wuling Air EV वर आधारित इलेक्ट्रिक कार असेल. हीची लांबी 2.9 मीटर आणि व्हीलबेस 2.01 मीटर एवढा असेल. या कारला ट्विन 10.25-इंचाचे स्क्रीन, 150 किमीची प्रत्यक्ष रेंज आणि 25 kWh बॅटरी पॅक मिळेल.

Citroen eC3 -Citroen यावर्षी आपली कॉम्पॅक्ट हॅचबॅक C3 लॉन्च केली होती. आता भारतात हिचे इलेक्ट्रिक वर्जनही येत आहे. कंपनीने नुकतेच म्हटले आहे, की या स्वस्तातल्या इलेक्ट्रिक कारचे नाव Citroen eC3 असे असेल. ही कार eCMP आर्किटेक्चरवर आधारित असेल. या कारची ड्रायव्हिंग रेन्ज जवळपास 300 किमी एवढी असू शकते, असा अंदाज वर्तवला जात आहे. 

टॅग्स :Electric Carइलेक्ट्रिक कारelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरcarकार