प्रिमियम बाईक्स बनवणाऱ्या हार्ले डेव्हिडसन कंपनीने आतापर्यंतची सर्वात स्वस्त बाइक लॉन्च केली आहे. या 350 सीसी बाईकला X350 असे नाव देण्यात आले आहे. नवीन बाईक कंपनीच्या स्पोर्टस्टर XR1200X सारखी दिसते. बाईकला गोल हेडलॅम्पसह मोनोपॉड इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि टीअर ड्रॉप आकाराचा पेट्रोल टँक देण्यात आला आहे. हे बाईकला क्लासिक स्पोर्ट लूक देतात.
हार्लेने बाइकला एलईडी हेडलॅम्प आणि टेल लाइटने सुसज्ज केले आहे. बाईकला फ्रंटमध्ये अपसाइड-डाउन फोर्क आणि रिअर-एंडवर मोनो-शॉक दिले आहेत. हार्ले डेव्हिडसन X350 च्या ब्रेकमध्ये चार-पिस्टन कॉलिपर्ससह एक सिंगल डिस्क अप फ्रंट आणि सिंगल-पिस्टन कॉलिपरसह एक सिंगल डिस्क सामील आहे. X350 चे वजन 180 किलोग्राम आहे.
पॉवरफुल इंजिनने सुसज्जX350 मध्ये QJ Motor ने डिझाइन केलेले 353cc पॅरलल-ट्विन इंजिन दिले आहे. हे इंजिन 36.2 बीएचपीच्या मॅक्सिमम पॉवर आणि 31 एनएमचा टॉर्क जनरेट करतो. इंजिनला 6-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले आहे. हे इंजिन खूप पॉवरफुल आहे. 350 सीसी इंजिन भारतात रॉयल एनफील्डसारख्या बाईकमध्ये पाहायला मिळतात. त्यामुळे ही बाईक रॉयल एनफील्डला टक्कर देण्याची शक्यता आहे.
काय आहे किंमत?हार्लेने ही बाइक चीनमध्ये लॉन्च केली आहे. याची किंमत 33,000 युआन म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये 3.93 लाख रुपये आहे. हार्ले डेविडसनने चीनी कंपनी क्यूजे मोटर्ससोबत ही नवीन बाइक तयार केली आहे. क्यूजे मोटर्स बेनेली बाइक बनवते. भारतीय बाजारात ही बाइक लवकरच मिळण्याची शक्यता आहे.