शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
5
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
6
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
7
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
8
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
9
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
10
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
11
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
12
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
13
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
14
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
15
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
16
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
17
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
18
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
19
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
20
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?

बुलेटलाही विसराल! मन जिंकण्यासाठी येतेय मेड-इन-इंडिया Harley बाइक; पाहा जबरदस्त लूक 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2023 4:06 PM

हार्ले-डेविडसन आणि हिरो मोटोकॉर्प कंपनी एकत्र मिळून भारतीय बाजारासाठी एक नवी बाइक तयार करत आहे.

हार्ले-डेविडसन आणि हिरो मोटोकॉर्प कंपनी एकत्र मिळून भारतीय बाजारासाठी एक नवी बाइक तयार करत आहे. सिंगल सिलिंडरवाली ही बाइक बाजारात प्रामुख्यानं रॉयल एनफील्डच्या बाइकला टक्कर देणार आहे. आता या बाइकचे काही फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत आणि समोर आलेल्या फोटोंनुसार बाइकचा लूक दमदार आहे. हार्ले डेविडसनची ही आजवरची सर्वात स्वस्त बाइक ठरणार असल्याचा दावा केला जात आहे. जी मुख्यत्वे भारतीय बाजारपेठेसाठी तयार केली जात आहे. या बाइकची चाचणी जयपूर स्थित हिरो मोटोकॉर्पच्या रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये केली जात आहे. म्हणजे लवकरच ही बाइक भारतीय रस्त्यांवर धावताना दिसेल. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार या बाइकचं डिझाइन आणि स्टायलिंगचं काम हार्ले-डेविडसननं केलं आहे. तर याचं इंजिनिअरिंग, टेस्टिंग आणि तिची निर्मिती पूर्णपणे हिरो मोटोकॉर्प कंपनीकडून केली जात आहे. समोर आलेल्या फोटोंनुसार या बाइकमध्ये डे-टाइम-रनिंग लाइट्सचा वापर केला गेला आहे. ज्यावर Harley-Davidson असं लिहिण्यात आलं आहे. असंच काहीसं नुकतंच लॉन्च झालेल्या टीव्हीएसच्या Ronin बाइकमध्येही पाहायला मिळालं होतं. 

इंजिन क्षमताHarley-Davidson च्या या नव्या बाइकमध्ये कंपनीनं एअर/ऑइल कूल्ड 400cc क्षमतेचं सिंगल सिलिंडर इंजिनचा वापर करण्यात येऊ शकतो. बाइकच्या मागच्या नंबर प्लेटवर पाहता येऊ शकेल की त्यावर HD 4XX असं लिहिलेलं आहे. हे बाइकच्या इंजिन क्षमतेचे संकेत मानले जात आहेत. बाइकमध्ये ६-स्पीड गियरबॉक्स पाहायला मिळू शकतो. पण अद्याप या बाइकच्या इंजिनच्या पावर आऊटपूटबाबत कोणतीही माहिती कळू शकलेली नाही. 

किंमत किती असेल?सध्या या बाइकची चाचणी केली जात आहे आणि लॉन्च आधीच या बाइकच्या किमतीबाबत माहिती देणं कठीण आहे. या बाइकच्या निर्मितीत हिरो मोटोकॉर्प कंपनी सक्रियपणे पुढाकार घेत आहे. त्यामुळे या बाइकची किंमत कमी असू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे. जवळपास २.५ ते ३ लाख रुपये इतक्या किमतीत ही बाइक भारतीय बाजारात लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. बाजारात दाखल झाल्यानंतर प्रामुख्यानं ही बाइक रॉयल एनफील्डच्या क्लासिक ३५० ला टक्कर देईल. 

केव्हा लॉन्च होणार?मीडिया रिपोर्टनुसार ही बहुप्रतिक्षीत बाइक जुलै ते ऑगस्टच्या दरम्यान सादर केली जाऊ शकते. तर दिवाळीच्या मुहूर्तावर भारतीय बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. येत्या काळात हार्ले-डेविडसन आणि हिरो मोटोकॉर्प ही बाइक वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय बाजारात देखील निर्यात करू शकते.

टॅग्स :Harley-Davidsonहार्ले डेव्हिडसनhero moto corporationहिरो मोटो कॉर्प