वाहन चालकांसाठी एक महत्वाची बातमी आली आहे. परिवाहन विभागाने जुन्या ड्रायव्हिंग लायसनला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी आणखी एक संधी दिली आहे. जर तुम्ही तुमचे ड्रायव्हिंग लायसन ऑनलाईन रजिस्टर केलेले नसेल तर ते लवकरात लवकर करून घ्या. यासाठीही मुदत आता कमी राहिली आहे. ती पुन्हा वाढविली जाणार नसल्याची सूचना परिवाहन विभागाने दिली आहे.
जर एखाद्या व्यक्तीकडे जुने ड्रायव्हिंग लायसन्स आहे आणि त्याने अद्याप ऑनलाइन नोंदणी केली नसेल, तर ती त्वरित करून घ्या, अन्यथा भविष्यात चकरा माराव्या लागतील. अशा परवानाधारकांना परिवहन विभागाकडून शेवटची संधी दिली जात आहे. परिवहन विभागाने देशातील सर्व जिल्ह्यांच्या डीटीओंना सूचना दिल्या आहेत. हस्तलिखित डीएल लवकरात लवकर ऑनलाइन करण्यात यावे, असे विभागाने म्हटले आहे. भारत सरकारच्या सारथी वेब पोर्टलवर 12 मार्च नंतर बॅकलॉग एंट्रीची तरतूद बंद केली जाणार आहे.
आता तुमचा DL आधारशी लिंक करणे देखील अनिवार्य करण्यात आले आहे. ज्यांचे DL पुस्तिकेत किंवा हस्तलिखिताद्वारे जारी केले गेले होते, त्यांचे DL आता ऑनलाइन जारी केले जातील. 12 मार्च रोजी दुपारी 4 वाजेपर्यंत मूळ परवाना घेऊन परिवहन कार्यालयात दाखल होणे बंधनकारक आहे. त्यासाठी सर्व आरटीओंना आदेश जारी करण्यात आले आहेत. परिवहन विभागाने सांगितले की, लोकांना हस्तलिखित DL ठेवण्यास खूप त्रास होतो, परंतु डिजिटल झाल्यानंतर, लोकांच्या DL ची संपूर्ण माहिती काही मिनिटांत ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध होईल.