नवं वर्ष हे ऑटो क्षेत्रासाठी चांगली बातमी घेऊन आलं आहे. देशात प्रवासी वाहनांच्या किंमतीत तब्बल 17.7 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. जानेवारी महिना हा प्रामुख्यानं कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकीसाठी चांगला ठरला आहे. मारूती सुझुकीची छोटी कार Alto हे देशातील बेस्ट सेलिंग कार ठरली आहे. गेल्या वर्षीही ग्राहकांनी या कारला पसंत केलं होतं. ग्राहकांच्या वाढत्या पसंतीमुळेच वर्षांच्या पहिल्याच महिन्यात बेस्ट सेलिंग कारचा बहुमान या ऑल्टोनं मिळवला आहे. या कारची किंमत, मायलेज आणि योसोबत मिळणारे फीचर्स प्रामुख्यानं या कारला खास बनवतात. भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विक्री होणाऱ्या गाड्यांच्या यादीत मारूती सुझुकीच्या ऑल्टो या कारनं पहिला क्रमांक पटकावला आहे. जानेवारी महिन्यातच या कारच्या जवळपास 18,260 युनिट्सची विक्री झाली. जानेवारी 2020 च्या तुलनेत ही संख्या थोडी कमी असली तरी या वर्षी जानेवारी महिन्यात विक्री झालेल्या कारच्या यादीत ही पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या वर्षी जानेवारी महिन्यात या कारच्या 18,914 युनिट्सची विक्री झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी गाडीच्या विक्रीत 3 टक्क्यांची घट झाली आहे. किती आहे किंमत?मारूती सुझुकी ऑल्टो 800 ही एकूण 8 व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध आहे. ऑल्टोचे बेस मॉडेल एसटीडी आणि ऑल्टोचं हाय व्हेरिअंट मॉडेल ऑल्टो 800 एलएक्सआय opt s-cng आहे. ऑल्टोची दिल्लीतील सुरूवातीच्या व्हेरिअंटची एक्स शोरूम किंमत 2 लाख 94 हजार 800 रूपये आहे. तर या कारचं टॉप मॉडेल 4 लाख 36 हजार 300 रूपयांचं आहे. ही कार पेट्रोल आणि सीएनजी या दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहे.
स्पेसिफिकेशन आणि मायलेजAlto चा 796cc 12 वॉल्व, 3 सिलिंडर BS6 पेट्रोल इंजिन 35.3 KW पॉवर आणिर 69 Nm चा टॉर्क जनरेट करतो. या इंजिनसह ५ स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनदेखील आहे. ऑल्टोचं पेट्रोल व्हेरिअंट जवळपास 22.05 kmpl चं मायलेज देतं. तर दुसरीकडे ऑल्टोच्या सीएनजी इंजिनबाबत सांगायचं झालं तर या व्हर्जनमध्ये इंजिन 30.1 kW पॉवर आणि 60 Nm चा टॉर्क जनरेट करते. सीएनजी व्हर्जनचं मायलेज 31.59 किमी प्रति किलोग्राम इतकं आहे. ऑल्टोमध्ये ड्युअल एअर बॅग्स, ड्रायव्हक आणि को-ड्रायव्हर सीट बेल्ट रिमांईंडर, ABS+EBD, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टम, इमोबिलायझर आणि रिअर डोअर चाईल्ड लॉकसारखे सेफ्टी फीचर्सही देण्यात आले आहेत.