शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

अपघाताच्या वेळी जखमींना मदत करून ठेवा माणुसकीचे भान

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 7:55 PM

अपघातग्रस्त व्यक्तीला तातडीने मदत करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अपघाताच्यावेळी बघ्याची भूमिका घेण्यापेक्षा एखाद्या माणसाची, आप्ताची जबाबदारीची भूमिका पार पाडणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे.

वाईट वेळ कोणावर सांगून येत नाही, पण जेव्हा जेव्हा कोणावर तशी वेळ येते, तेव्हा तेव्हा प्रत्येकाने आपला मदतीचा हात नेहमीच पुढे करायला हवा. रस्त्यावरील अपघाताच्यावेळी तर याचे भान प्रत्येकाने ठेवायला हवे. मग तो वाहन चालक असो, वाहनातील सुखरूप असणारी व्यक्ती असो, अन्य वाहनांमधील प्रवासी असोत की पादचारी असो. रस्त्यावर होणाऱ्या अपघाताच्यावेळी अनेकदा माणसांमधील माणुसकी संपलेली असल्याचे चित्र सध्या अनेक अपघातांमध्ये दिसते. काही मोजकी लोक आपले माणुसकी निभावण्याचे भावनिक कर्तव्य पार पाडत असतात, मात्र अनेकजण त्यापासून काही बोध न घेता केवळ बघ्याची भूमिका घेतात. अलीकडेच नवी मुंबईत झालेल्या एका स्कूटर अपघातात एका महिलेचा रस्त्याच्या बाजूला असलेल्या खराब भागांमुळे स्कूटरचा तोल जाऊन मागून येणाऱ्या डंपरखाली येऊन अतिशय भीषण मृत्यू झाला. त्या डंपरचालकाची चूक नव्हती मात्र तो पळून गेला पण त्याहीपेक्षा मागून येणार्या वाहनांपैकी कोणीही त्या महिलेच्या मदतीसाठी आले नव्हते. विशेष म्हणजे ही अतिशय संतापजनक बाब सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये चित्रित झाली, खासगी वृत्तवाहिन्यांवरही तो प्रसंग दाखवण्यात आला होता.वास्तविक कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यानंतर त्या अपघातग्रस्त व्यक्ती वा व्यक्तींना वाचवण्यासाठी प्रत्येकाने शक्य तितके प्रयत्न करायला हवेत. अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला रुग्णालयातही दाखल करून घेताना त्या जखमी व्यक्तीला आणणार्या व्यक्तीला आज पोलिसांकडून विचारणा वा त्रासही होत नाही. असे असताना ज्यांचा अपघाताशी संबंध नसतो, त्यांनी पुढे येऊन अपघातग्रस्त व्यक्तीला रुग्णालयापर्यंत नेण्यास काहीच हरकत नाही. नव्हे तसे करणे हे त्यांचे प्रत्येक नागरिकाचे व माणूस म्हणून कर्तव्य आहे. दुर्दैवाने लोक आज तेच विसरत चालले आहेत.अपघाताच्यावेळी मागून येणार्या अन्य वाहनांमधील कोणी उतरूनही ते काम केले नाही की जवळपास असलेल्या व्यक्तीनेही त्या महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली नाही. अखेर पोलिसांना ते लक्षात आल्यानंतर त्यांनी तेथे धाव घेतली.मात्र त्या महिलेच्यादृष्टीने सारेच संपले होते. अशा प्रकारच्या विविध घटनांच्यावेळी प्रत्येकाने आपले मदतीचे हात पुढे केले पाहिजेत. अपघातात जखमीची स्थिती काय आहे, ती शुद्धीवर आहे का, हे पाहून त्या व्यक्तीला सावकाश बाजूला घेऊन, धीर देत, बेशुद्ध वा मूर्च्छित नसल्यास पाणी पाजण्याचे, शुद्धीवर नसल्यास शुद्धीवर आणण्यासाठी मोकळ्या जागी नेण्याचे काम नक्कीच केले पाहिजे. पोलिसांना वा रुग्णवाहिकेलाही बोलावण्याचे कर्तव्य कोणी ना कोणी पार पडेल यावर अवलंबून न राहाता स्वतःच्या खिशातील मोबाइलवरून तशी माहिती त्यांना देण्यास काहीच हरकत नाही. अन्य वाहनांमध्ये प्रथमोपचार साहित्य असले पाहिजे. त्या त्या वाहनचालकांनीही त्याप्रसंगी तेथे थांबून त्या व्यक्तीला प्रथमोपचाराची मदत केली पाहिजे. अपघातग्रस्त व्यक्तीचे सामान, त्याच्या वाहनाचे रस्त्यावर काही अडथल्यासारखे असलेले अवशेषही बाजूला करून अन्य वाहनांची वाहतूक कोंडी होणार नाही, इतके पाहिले पाहिजे. त्या जखमी व्यक्तीला आपल्या वाहनातून रुग्णालयात नेण्याचे कामही तातडीने व जबाबदारीने केले पाहिजे. यामध्ये माझा वेळ किती जाईल,मला काय करायचे आहे, असा अयोग्य विचारांमध्ये कधीही वावरू नये. किंबहुना माणुसकीचे भान आज प्रत्येकाला खर्या अर्थाने येण्याची गरज आहे.

टॅग्स :carकारAccidentअपघात