नवी दिल्ली: कोरोना संकटानंतर ऑटोमोबाइल क्षेत्र हळूहळू सावरताना दिसत असून, वाहनांच्या विक्रीत मोठी वाढ होत असल्याचे दिसत आहे. यातच पेट्रोल आणि डिझलचे दर गगनाला भिडले असल्यामुळे ग्राहक इलेक्ट्रिक वाहनांना पसंती देत असल्याचे दिसत आहे. तसेच सणासुदीच्या कालावधीत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्या विविध क्लृप्त्या, ऑफर देत आहेत. देशातील आघाडीची इलेक्ट्रिक दुचाकी उत्पादक Hero Electric ने ग्राहकांसाठी '३० दिवस, ३० बाइक्स' उत्सव ऑफरची घोषणा केली.
हिरो इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करणारे सर्व ग्राहक या ऑफरसाठी पात्र असतील. कंपनीची ही सणासुदीची ऑफर ७ ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरपर्यंत वैध असेल. या स्पर्धेतील विजेत्यांची निवड लकी ड्रॉद्वारे केली जाईल. विजेता म्हणून निवड झाल्यास ग्राहकाला खरेदी केलेल्या स्कूटरची संपूर्ण एक्स-शोरूम किंमत परत केली जाईल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
मोफत हिरो इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची संधी
या ऑफरअंतर्गत भाग्यवान ग्राहकांना कंपनीच्या भारतातील ७०० पेक्षा जास्त डीलरशिपमध्ये मोफत हिरो इलेक्ट्रिक स्कूटर जिंकण्याची संधी मिळेल. कंपनी दररोज एक भाग्यवान ग्राहकाची घोषणा करेल, जो त्यांच्या आवडत्या इलेक्ट्रिक दुचाकीला मोफत घरी घेऊन जाईल. हिरो इलेक्ट्रिकच्या दुचाकी कंपनीच्या वेबसाईटवरून ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्हीप्रकारे बूक करता येतील. कंपनीकडून सर्व प्रोडक्ट्सची होम डिलिव्हरी करणार असून, ५ वर्षांची विस्तारित वॉरंटी देखील मिळते.
हिरो इलेक्ट्रिकची एक अनोखी उत्सव ऑफर
ग्रीन मोबिलिटी सोल्यूशन्सला चालना आणि प्रोत्साहन देण्यासाठी, इलेक्ट्रिक दुचाकी घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी हिरो इलेक्ट्रिकने एक अनोखी उत्सव ऑफर आणली आहे. हीरो इलेक्ट्रिकचा विस्तार करण्यासह ३० भाग्यवान ग्राहकांना मोफत इलेक्ट्रिक दुचाकी देऊन उत्सव साजरा करण्याची ही एक उत्तम संधी आहे. आम्ही सर्वजण एका अद्भुत सणाच्या हंगामासाठी सज्ज आहोत जे भारतासाठी इलेक्ट्रिक वाहन क्रांतीला अधिक बळकट बनवेल आणि चालना देईल, असे हिरो इलेक्ट्रिकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सोहिंदर गिल म्हणाले.