Hero MotoCorp भारतीय बाजारपेठेसाठी XPulse 400 आणि Xtreme 400S सह अनेक नवीन मोटरसायकलवर काम करत आहे. एका नवीन मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की कंपनी यावर्षी देशात आयकॉनिक प्रीमियम मोटरसायकल ब्रँड करिझ्मा पुन्हा सादर करण्यासाठी सज्ज आहे.
नवीन Hero Karizma नवीन इंजिनसह सुसज्ज असेल. कंपनीनं एक नवीन मोटरसायकल प्लॅटफॉर्म विकसित केले आहे, जे ब्रँडला प्रीमियम स्पेसमध्ये स्पर्धा करण्यास मदत करेल. जुन्या करिझ्मामध्ये 20bhp, 223cc एअर-कूल्ड फ्युएल इंजेक्टेड इंजिन देण्यात आलं होतं.काय असू शकतात फीचर्सनवीन Hero Karizma मध्ये अधिक शक्तिशाली 210cc लिक्विड-कूल्ड इंजिन मिळू शकते. नवीन पॉवरट्रेने सुमारे 25 Bhp पॉवर आणि 30 Nm टॉर्क जनरेट करेल अशी अपेक्षा आहे. हे इंजिन सिक्स-स्पीड गिअरबॉक्सशी जोडले जाईल. डायमेंशन, सस्पेन्शन सेटअप आणि ब्रेकिंग सिस्टमबद्दल येत्या काळात काही माहिती समोर येऊ शकते. जुन्या मॉडेलप्रमाणेच काही स्टायलिंग एलिमेंट्सही यात सामील केले जाऊ शकतात.
हीरोची पॉप्युलर बाईककरिझ्मा हीरो मोटोकॉर्पसाठी देशातील सर्वात लोकप्रिय मोटरसायकल ब्रँडपैकी एक होती. कंपनीनं 2014 मध्ये अपडेटेड बाइक्स सादर केल्या होत्या. परंतु यापूर्वीच्या जनरेशनला ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यानंतर ते डिस्कंटिन्यू करण्यात आलं. नवीन मॉडेलसह, हीरो प्रीमियम मोटरसायकल विभागात प्रवेश करण्याचा विचार करीत आहे. हीरोकडे सध्या प्रीमियम मोटरसायकल सेगमेंटमध्ये एक्सपल्स आहे.