Hero Karizma XMR Bookings: काही दिवसांपूर्वीच भारतातील सर्वात मोठी टू-व्हिलर कंपनी Hero मोटोकॉर्पने आपल्या लोकप्रिय Karizma बाईकचे नवीन व्हर्जन बाजारात लॉन्च केले. या बाईकला ग्राहकांकडून मोठी पसंती मिळत आहे. आतापर्यंत या बाईकला 13,688 बुकिंग मिळाल्याची माहिती कंपनीने दिली आहे.
ग्राहकांची वाढती मागणी पाहता कंपनीने हिरो डीलरशिप्सकडे गाड्या पाठवल्या आहेत. या महिन्याच्या अखेरीस ग्राहकांना गाडीची डिलिव्हरी मिळणे सुरू होईल. हिरोने नवीन Karizma XMR 210 ला 1,72,900(एक्स-शोरुम) रुपयांच्या किमतीवर लॉन्च केले आहे.
किंमत वाढलीया किमतीवर 29 ऑगस्ट 2023 ला बाईकची बुकिंग सुरू झाली होती, पण 30 सप्टेंबर 2023 ला बुकिंग बंद करण्यात आली. यानंतर या बाईकची किंमत 7,000 रुपयांनी वाढवण्यात आली. आता ही बाईक 1,79,900 रुपये (एक्स-शोरुम, दिल्ली) किमतीवर उपलब्ध आहे. कंपनी लवकरच नवीन बुकिंग विंडोची घोषणा करेल.
इंजिन
नवीन Karizma XMR मध्ये लिक्विड-कूल्ड, 210cc, सिंगल-सिलेंडर इंजिन दिले आहे, जे 25.5bhp आणि 20.4Nm जनरेट करण्यास सक्षम आहे. इंजिनमध्ये 6-स्पीड गिअरबॉक्स येईल, जो स्लिप आणि असिस्ट क्लचने सुसज्ज असेल. या नवीन करिझ्माला टेलीस्कोपिक फ्रंट फोर्क आणि रिअरमध्ये प्रीलोड अॅडजस्टेबल मोनोशॉक मिळतील.
फीचर्स
ब्रेकिंग सिस्टीमसाठी बाईकमध्ये 300 मिमी फ्रंट आणि 240 मिमी रिअर डिस्क ब्रेक्स मिळतील. तसेच यात ड्युअल-चॅनल एबीएस स्टँडर्ड आहे. बाईक तीन कलर ऑप्शन्स- आयकॉनिक यलो, मॅट फँटम ब्लॅक आणि टर्बो रेडमध्ये उपलब्ध आहे. नवीन करिझ्मा एक्सएमआर सेगमेंट-फर्स्ट अॅडजस्टेबल विंडशील्ड, इंटेलिजेंट इल्यूमिनेशन हेडलँप आणि टर्न-बाय-टर्न नॅव्हिगेशनने सुसज्ज असेल.