Hero Mavrick 440 Launch Date: देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Hero MotoCorp मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, येत्या 22 जानेवारी रोजी हिरोची बहुचर्चित Maverick 440 बाईक लॉन्च होणार आहे. कंपनीचे या वर्षातील हे पहिलेच लॉन्च असेल. हिरो मोटोकॉर्पची ही फ्लॅगशिप बाईक असून, हिरोच्या लाइनअपमधील सर्वात महागडी बाईक असण्याची अशी अपेक्षा आहे.
किमंत किती असेल?रिपोर्ट्सनुसार, Maverick 440 ची किंमत अंदाजे 2 लाख रुपये असेल. असे झाल्यास, हार्ले-डेव्हिडसन X440 पेक्षा कमी किमतीत ही बाईक बाजारात येईल. हार्लेची किंमत रु. 2,39,500 ते रु. 2,79,500 (एक्स-शोरूम) दरम्यान आहे. लॉन्च झाल्यानंतर मॅव्हरिक 440cc बाईक रॉयल एनफिल्ड क्लासिक 350, ट्रायम्फ स्क्रॅम्बलर 400X आणि ट्रायम्फ स्पीड 400 यांसारख्या बाइकशी स्पर्धा करेल.
Hero Maverick 440 मध्ये X440 प्रमाणेच 440cc सिंगल-सिलेंडर, ऑईल/एअर-कूल्ड इंजिन असेल, जे 6,000rpm वर 27bhp पॉवर आणि 4,000rpm वर 38Nm टॉर्क निर्माण करते. पण, प्रत्यक्षात हे आकडे वेगळे असू शकतात. फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर, Hero Karizma X MAG चे काही फीचर्स Maverick 440 मध्ये दिसण्याची अपेक्षा आहे.
इतर फीचर्समध्ये TFT स्क्रीन, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन सारखी वैशिष्ट्ये असू शकतात. यात Apple/Android दोन्ही उपकरणांशी सुसंगत अॅपद्वारे स्मार्टफोन इंटिग्रेशन देखील असेल. बाईकला समोर राउंड हेडलॅम्प, मस्क्यूलर फ्युएल टँक, बार-एंड मिरर असण्याची शक्यता आहे.