नवी दिल्ली : भारतातील प्रसिद्ध कंपनी हिरो मोटोकॉर्पने नुकतीच आपल्या नवीन बाईकचे डिझाईन पेटेंट केले आहे. हिरोची ही नवी बाईक Mavrick 440 Scrambler या नावाने ओळखली जाणार आहे. नावाप्रमाणेच ही बाईक हिरोच्या सध्याच्या Mavrick 440 वर आधारित असणार आहे. मात्र दोन्ही बाइकमधील फरक दाखवण्यासाठी लूक आणि डिझाईनमध्ये काही बदल केले जाऊ शकतात. लाँचिंगनंतर हिरोच्या या बाईकची टक्कर रॉयल एनफिल्डच्या बाईससोबत होऊ शकते.
हिरोची नवीन बाईक Mavrick 440 Scrambler चे डिझाइन कंपनीची आधीची Mavrick 440 या बाईकसारखीच अशू शकते. मात्र, ग्राहकांना नवीन लाँच करणाऱ्या या बाईकमध्ये आधीच्या व्हर्जनपेक्षा नक्कीच वेगळी डिझाईन आणि फरक बघायला मिळणार आहे. Mavrick 440 Scrambler या बाईकमध्ये गेटर्ड टेलिस्कोपिक फोर्क दिला जाऊ शकतो. तसेच, येत्या काळात हिरोची ही नवी बाईक कोणत्या फीचर्ससोबत एन्ट्री घेते, हे पाहावं लागणार आहे.
संभाव्य फीचर्समीडिया रिपोर्ट्सनुसार, हिरोने आगामी Mavrick 440 Scrambler ला लहान फ्लायस्क्रीन आणि हँडलबास ब्रेसेस दिले आहेत. यामुळे बाईकचे हार्ड लुक ग्राहकांना बघायला मिळेल. याशिवाय, या बाईकला टेन स्पोक डिझाइनसह नवीन अलॉय व्हील्स दिले जाऊ शकतात. तसेच, बाईकला 19 इंचाचे फ्रंट व्हील देण्यात येऊ शकते, जेणेकरून तुम्ही छोटासा हलका ऑफ-रोडचा अनुभव घेऊ शकता.
इंजिन स्पेसिफिकेशन्सहिरोच्या नव्या Mavrick 440 Scrambler बाईकमध्ये दमदार क्रॅश गार्ड मिळेल. जो पेट्रोल टाकीच्या खालच्या भागापासून इंजिनच्या संपपर्यंत आहे. यात एक संप गार्डही असेल, पण हे गार्ड नेमकं मेटलचे आहे की, प्लास्टिकचे, हे पाहावे लागेल. दोन्ही बाईकमधील फरक बघायला गेल्यास यात Mavrick 440 Scrambler वरील नवीन ट्यूबलर ग्रॅब हँडल देण्यात आले आहेत. तर हिरो Mavrick 440 मध्ये 440 सीसीचे ऑइल कूल्ड इंजिन देण्यात आले आहे. दरम्यान, Mavrick 440 Scrambler या बाईकच्या इंजिन स्पेसिफिकेशनचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.
किंमत किती असेल?Mavrick 440 ची एक्स शोरूम किंमत 1.99 लाख ते 2.24 लाख रुपयांदरम्यान आहे. त्यामुळे Mavrick 440 Scrambler व्हर्जनची किंमतही अशीच असण्याची शक्यता आहे. Mavrick 440 च्या तुलनेत Mavrick 440 Scrambler थोडी महाग देखील असू शकते. दरम्यान कंपनीने अद्याप नवीन Mavrick 440 Scrambler बाईकची किंमत सांगितलेली नाही.