शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
5
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
6
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
7
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
8
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
9
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
10
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
11
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
12
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
13
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
14
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
15
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
16
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
17
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
18
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
19
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
20
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश

कार पाठोपाठ बाईकच्याही किंमती वाढणार; Hero Motocorp नं केली किंमती वाढवण्याची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2021 7:13 PM

Hero Motocorp १ एप्रिल पासून आपल्या बाईक आणि स्कूटरच्या किंमती वाढवणार आहे. पाहा किती होणार दरवाढ

ठळक मुद्देकंपनी १ एप्रिल पासून आपल्या बाईक आणि स्कूटरच्या किंमती वाढवणार आहे. निस्सान आणि मारूती सुझुकीनंही केली दरवाढीची घोषणा

बाईक्स आणि स्कूटर्सचं उत्पादन करणारी कंपनी हीरो मोटोकॉर्पनं आपल्या बाईक आणि स्कूटरच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मंगळवारी कंपनीनं यासंदर्भातील घोषणा केली. यापूर्वी कार उत्पादक कंपनी मारूती सुझुकी आणि निस्सानही आपल्या कारच्या किंमती १ एप्रिलपासून वाढवण्याची घोषणा केली होती.कच्चा मालाची किंमत वाढल्यामुळे आपल्याला बाईक्स आणि स्कूटरच्या किंमती वाढवाव्या लागत असल्याची माहिती Hero Motocorp ने शेअर बाजाराला दिली. कंपनीनं दिलेल्या माहितीनुसार निरनिराळ्या प्रकारातील वाहनांनुसार त्याच्या किंमतीत अडीच हजार रूपयांपर्यंत वाढ केली जाणार आहे. कंपनीची ही दरवाढ १ एप्रिल पासून लागू होणार आहे. निस्सानच्याही गाड्या महागणारऑटो पार्ट्सच्या किंमती सातत्यानं वाढत आहेत. गेल्या काही महिन्यांमध्ये कंपनीनं किंमती न वाढवण्याचे प्रयत्न केले. परंतु आता कंपनी सर्व Nissan आणि Datsun च्या गाड्यांच्या किंमती वाढवणार आहे, असं कंपनीकडून सांगण्यात आलं. तसंच प्रत्येक व्हेरिअंटप्रमाणे या किंमती निरनिराळ्या असतील असंही कंपनीनं स्पष्ट केलं. प्रत्येक व्हेरिअंटनुसार गाड्यांच्या किंमती वाढवल्या जात आहे. परंतु आताही भारतीय ग्राहकांना बेस्ट व्हॅल्यू प्रपोझिशन उपलब्ध करून दिलं जात आहे, अशी प्रतिक्रियाा निसान मोटर्सचे व्यवस्थापकीय संचालक राकेश श्रीवास्तव यांनी दिली. मारूती सुझुकीही करणार दरवाढएप्रिल महिन्यात Maruti Alto पासून Maruti Brezza पर्यंत अनेक कार्स महाग होणार आहेत. या वर्षात कंपनी दुसऱ्यांदा आपल्या कार्सच्या किंमतीत वाढ करणार आहे. यापूर्वी कंपनीनं जानेवारी महिन्यात आपल्या कार्सच्या किंमती वाढवल्या होत्या. Maruti Suzuki नं दिलेल्या माहितीनुसार ही दरवाढ निरनिराळ्या कार्सच्या मॉडेलवर अवलंबून असणार आहे. परंतु कोणत्या कारची किंमत किती वाढेल याबाबत माहिती देण्यात आली नाही. गेल्या वर्षभरापासून कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे वाहन क्षेत्राला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तसंच मागणी कमी आणि कारसाठी आवश्यक असलेल्या अन्य उत्पादनांच्या वाढलेल्या किंमतीमुळे काही कंपन्यांनी आपल्या गाड्यांच्या किंमतीत वाढ केली होती. 

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पbikeबाईकcarकारMaruti Suzukiमारुती सुझुकीNissanनिस्सान