जगातील सर्वात मोठ्या दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) आपल्या संभाव्य खरेदीदारांना आकर्षित करण्यासाठी खास ऑफर लाँच केली आहे. कंपनीने विशेष रिटेल फायनान्स कार्निव्हल (Retail Finance Carnival) सुरू केला आहे. या अंतर्गत खरेदीदार कोणत्याही डाउन पेमेंटशिवाय आणि ब्याज न देता Hero MotoCorp मोटरसायकल आणि स्कूटर खरेदी करण्याचा लाभ घेऊ शकतात. एवढेच नाही तर केवळ आधार कार्ड दाखवून ग्राहक कर्ज घेऊ शकणार आहेत.
खास योजनावर्षाच्या अखेर फेस्टिव्ह मूडमध्ये अधिक उत्साह वाढवण्यासाठी, रिटेल फायनान्स कार्निव्हल Hero MotoCorp च्या वित्त भागीदारांमार्फत अनेक नवीन आणि रोमांचक रिटेल वित्त योजना आणते. या उपक्रमाद्वारे, कंपनीचे उद्दिष्ट विविध क्षेत्रांतील ग्राहकांसाठी रिटेल फायनान्समध्ये प्रवेश, उपलब्धता, जागरूकता आणि नवकल्पना यांना प्रोत्साहन देण्याचे आहे.
31 डिसेंबरपर्यंत योजनाशुक्रवारपासून सुरू झालेला हा कार्निव्हल 31 डिसेंबर 2021 पर्यंत सुरू राहणार आहे. कार्निव्हलमुळे देशातील विविध विभागातील खरेदीदारांना फायनान्सवर सहज वाहने खरेदी करता येतील. या अंतर्गत ग्राहकांना झिरो डाउन पेमेंट, शून्य व्याज दर आणि शून्य प्रक्रिया शुल्क यासारख्या आकर्षक आणि प्रथम श्रेणीतील ऑफर देण्यात येत आहेत.
किसान हप्ता योजना मुख्य ऑफर व्यतिरिक्त, कार्निव्हल ग्राहकांना किसान हप्ता, नो हायपोथेकेशन आणि सुविधा (बँकेच्या चेकशिवाय) यासारखी विशेष फायनान्सियल प्रोडक्ट्स देखील देत आहे.
आधार कार्डद्वारे मिळेल कर्जHero MotoCorp ने आधार कार्ड आधारित कर्ज अर्ज योजना देखील सुरू केली आहे, ज्या अंतर्गत ग्राहकांना वाहन वित्तपुरवठा करण्यासाठी त्यांचे आधार कार्ड सादर करणे आवश्यक आहे. या योजनांचा लाभ घेण्यासाठी ग्राहक अधिकृत Hero MotoCorp डीलरशिप आणि ऑनलाइन चॅनेलला भेट देऊ शकतात.