शहरं
Join us  
Trending Stories
1
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
2
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
3
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
4
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
5
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
6
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
7
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
8
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
9
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
10
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
11
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
12
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
13
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
14
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
16
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
17
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
18
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
19
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
20
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके

Hero Motocorp ची पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Vida V1 लाँच; 165KM ची मिळेल रेंज

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2022 4:20 PM

Vida V1 : कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक वाहन कंपनी - Vida अंतर्गत पहिली स्कूटर Vida V1 लाँच केली आहे. ही स्कूटर Vida V1 Plus आणि V1 Pro या दोन व्हेरिएंटमध्ये आणली गेली आहे. 

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी दुचाकी उत्पादक कंपनी हिरो मोटोकॉर्पने (Hero MotoCorp) अखेर आज इलेक्ट्रिक टू-व्हीलर सेगमेंटमध्ये एन्ट्री केली आहे. कंपनीने आपल्या नवीन इलेक्ट्रिक वाहन कंपनी - Vida अंतर्गत पहिली स्कूटर Vida V1 लाँच केली आहे. ही स्कूटर Vida V1 Plus आणि V1 Pro या दोन व्हेरिएंटमध्ये आणली गेली आहे. 

हिरो कंपनीचा दावा आहे की, इलेक्ट्रिक स्कूटरला अनेक उत्कृष्ट फीचर्ससह सादर करण्यात आले आहे. यात टच स्क्रीन डिस्प्ले, क्रूझ कंट्रोल, कीलेस कंट्रोल आणि अॅलॉय व्हील यांसारखे फीचर्स आहेत. कंपनीने इलेक्ट्रिक स्कूटर दीड लाखांच्या रेंजमध्ये आणली आहे. कंपनीने Vida V1 Plus ची किंमत 1.45 लाख रुपये आणि V1 Pro ची किंमत 1.59 लाख रुपये आहे. या स्कूटरचे बुकिंग 10 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. 

ग्राहक स्कूटर 2499 रुपयांमध्ये बुक करू शकतात. स्कूटरची डिलिव्हरी डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात सुरू होईल. सुरुवातीला ही स्कूटर दिल्ली, बंगळुरू आणि जयपूर या तीन शहरांमध्ये उपलब्ध करून दिली जाईल. डिसेंबरमध्ये दुसऱ्या टप्प्यात आणखी शहरे जोडली जातील. बुकिंगसाठी ग्राहक कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर लॉग इन करू शकतात.

Vida V1 Pro हे Vida V1 चे अधिक पॉवरफुल व्हर्जन आहे. ही स्कूटर फुल चार्जमध्ये 165 किमी अंतर कापते. स्कूटरचा टॉप स्पीड 80KM प्रति तास आहे. ती 3.2  सेकंदात 0 ते 40kmph चा वेग गाठते.

Vida V1 Plus हे Vida V1 चे कमी पॉवरफुल व्हर्जन आहे. ही स्कूटर फुल चार्जमध्ये 143 किमी अंतर कापते. स्कूटरचा टॉप स्पीड 80KM प्रति तास आहे. ती 3.4 सेकंदात 0 ते 40kmph चा वेग गाठते.

Hero Vida V1: 70 टक्क्यांपर्यंत किमतीवर बायबॅककंपनी ग्राहकांना Vida V1 साठी किमतीच्या 70 टक्क्यांपर्यंत बायबॅक योजना ऑफर करणार आहे. याशिवाय ग्राहकांचा भरोसा वाढवण्यासाठी कंपनी 72 तास किंवा 3 दिवसांसाठी टेस्ट राइड प्लॅन ऑफर करेल. Vida V1 इलेक्ट्रिक स्कूटरची बॅटरी IP67 रेटिंग आहे. Vida V1 एक 'स्मार्टफोन ऑन व्हील्स' असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. म्हणजेच, तुमच्या स्मार्टफोनला कनेक्ट केल्यानंतर, ते डिस्प्लेवर सर्व आवश्यक माहिती दर्शवते.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पelectric vehicleइलेक्ट्रिक कार / स्कूटरAutomobileवाहन