शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआकडून लाडकी बहीण योजनेच्या कालावधीबाबत शंका; देवेंद्र फडणवीस ठामपणे म्हणाले...
2
भारतविरोधी षड्यंत्रात काँग्रेस सामील; समाजाला कमकुवत करण्याचा प्रयत्न, PM मोदींचा घणाघात
3
भक्तांसाठी आनंदाची बातमी: निमगाव खंडोबा क्षेत्र विकासासाठी २४ एकर जमीन; शासन निर्णय जारी 
4
"सकाळी नऊ वाजताचा भोंगा, रात्रीच तयारी करून बसला होता"; फडणवीसांनी राऊतांना डिवचलं
5
धक्कादायक! प्रेमाच्या त्रिकोणातून तरुणीने केली तरुणीची हत्या
6
"खोट्याच्या कडू घोटावर विकासाची गॅरंटी भारी पडली’’, हरयाणातील विजयानंतर मोदींचा टोला 
7
वडील-काकाची दहशतवाद्यांनी केलेली हत्या; मुस्लिमबहुल मतदारसंघातून शगुन परिहार विजयी
8
"हरयाणात भाजपा EVMमध्ये छेडछाड करून जिंकला, हा निकाल मान्य नाही’’, काँग्रेसची संतप्त प्रतिक्रिया
9
हरयाणात झाली रोमांचक लढत, अवघ्या ३२ मतांनी फैसला, अखेरीस जिंकलं कोण? पाहा 
10
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
11
Haryana Assembly Election Results 2024 : दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
12
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
13
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
14
Ola नंतर Ather नं इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमती केल्या कमी, आता स्वस्तात खरेदी करण्याची संधी!
15
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
16
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
17
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
18
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
19
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
20
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?

गुंतवणूकदारांची निराशा; Hero मोटर्सने 900 कोटींचा IPO मागे घेतला, कारण काय..?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 07, 2024 7:03 PM

Hero Motors IPO Update: हीरो मोटर्सने SEBI कडे जमा केलेले कागदपत्र परत घेतले आहेत.

Hero Motors IPO: गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात मोठी घसरण सुरू आहे. त्याचा परिणाम आयपीओ मार्केटवरही पडू लागला आहे. यामुळेच आता, देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी Hero Motors Company Group ची ऑटो कंपोनंट फर्म Hero Motors Limited ने आपला IPO लॉन्च करण्याचा निर्णय मागे घेतला आहे. हिरो मोटर्स लिमिटेडने 900 कोटी रुपयांचा IPO लॉन्च करण्यासाठी शेअर बाजार नियामक SEBI कडे दाखल केलेले कागदपत्रही मागे घेतले आहेत.

Hero Motors ने SEBI कडे सादर केलेल्या प्रस्तावित IPO च्या मसुद्यानुसार, Rs 900 कोटी IPO मध्ये, कंपनीने 500 कोटी रुपयांचे शेअर्स ताज्या इश्यूद्वारे आणि 400 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफर फॉर सेलद्वारे विकण्याची योजना आखली होती. कंपनीच्या प्रवर्तकांनी ऑफर फॉर सेलद्वारे कंपनीतील आपला हिस्सा विकण्याची योजना आखली होती. ऑफर फॉर सेलमध्ये, ओपी मुंजाल होल्डिंग्स 250 कोटी रुपयांचे शेअर्स, भाग्योदय इन्व्हेस्टमेंट्स आणि हिरो सायकल्स 75 कोटी रुपयांचे शेअर्स विकणार होते. 

हिरो मोटर्समध्ये प्रवर्तक ओपी मुंजाल होल्डिंग्सची सर्वाधिक 71.55 टक्के भागीदारी आहे. तर भाग्योदय इन्व्हेस्टमेंटकडे 6.28 टक्के आणि हिरो सायकल्सकडे 2.03 टक्के हिस्सा आहे. याशिवाय, Hero Motors मध्ये South Asia Growth Invest LLC ची 12.27 टक्के हिस्सेदारी आहे.

IPO प्रस्ताव 5 ऑक्टोबर रोजी मागे घेतलाHero Motors Limited ने ऑगस्ट 2024 मध्ये IPO लॉन्च करण्यासाठी SEBI कडे मसुदा कागदपत्रे दाखल केली होती. IPO मागे घेण्याच्या कारणांचे स्पष्टीकरण देताना कंपनीने सांगितले की, Hero Motors Limited ने 5 ऑक्टोबर 2024 रोजी ड्राफ्ट पेपर मागे घेतला आहे. कंपनीने नवीन शेअर्स देऊन उभी केलेली रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी आणि उत्तर प्रदेशातील गौतम बुद्धनगर येथील कंपनीच्या प्लांटच्या विस्तारासाठी वापरण्याची योजना होती.

BMW आणि Ducati हेदेखील ग्राहक हिरो मोटर्स लिमिटेड इलेक्ट्रिक आणि नॉन-इलेक्ट्रिक पॉवरट्रेन तयार करते. त्याचे ग्राहक अमेरिका, युरोप, भारत आणि ASEAN मधील OEM आहेत. BMW, Ducati, Envylo International, Formula Motorsport, Humming Bird EV, HWA सारख्या कंपन्या हीरो मोटर्सच्या ग्राहक आहेत. हीरो मोटर्स ही भारतातील एकमेव कंपनी आहे, जी जागतिक ई-बाईक कंपन्यांसाठी CVT तयार करते. कंपनीच्या भारत, ब्रिटन आणि थायलंडमध्ये 6 उत्पादन कंपन्या आहेत.

टॅग्स :hero moto corporationहिरो मोटो कॉर्पIPOइनिशिअल पब्लिक ऑफरिंगshare marketशेअर बाजार