Hero Splendor+ XTEC 2.0 Launched: देशातील आघाडीची टू-व्हिलर कंपनी Hero MotoCorp ने आपल्या सर्वात लोकप्रिय स्पेंलडर (Splendor) चे नवीन एडिशन लॉन्च केले आहे. कंपनीच्या सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या Splendor बाईकला लॉन्च होऊन 30 वर्षे झाल्याच्या निमित्ताने कंपनीने नवीन Splendor+ XTEC 2.0 लॉन्च केली आहे. कंपनीने या न्यू जनरेशन Splendor+ XTEC 2.0 मध्ये प्रीमियम फीचर्स दिले आहेत.
Splendor+ XTEC 2.0 चे डिझाइनकंपनीने बाईकच्या डिझाइनमध्ये फार बदल केलेला नाही, पण फ्रंटमध्ये LED हेडलाइट्स दिले आहेत, जे हाय इंटेंसिटी पोझीशन लॅम्पसह येतात. याशिवाय बाईकमध्ये यूनिक H-शेप्ड सिग्नेचर टेल लॅम्प दिला आहे, जो बाईकला अतिशय आकर्षक लुक देतो. मायलेजबद्दल बोलायचे तर, कंपनीच्या दाव्यानुसार, ही बाईक 73 kmpl चे मायलेज देते.
Splendor+ XTEC 2.0 चे फीचर्स
बाईकच्या इतर फीचर्सबद्दल बोलायचे झाले, तर यात डिजिटल स्पीडोमीटर मिळतो, जो इको-इंडियकेटरसह येतो. हे ज्यास्त मायलेजसाठी खुप चांगले फीचर आहे. हे रिअल टाईम मायलेज इंडिकेटरला सपोर्ट करतो. याशिवाय, बाईकमध्ये कॉल आणि एसएमएससाठी ब्लूटूथ कनेक्टिविटी मिळते. याशिवाय, सुरक्षेसाठी यात हजार्ड लाइट्सदेखील मिळतात. विशेष म्हणजे, आधीच्या तुलनेत या बाईकला जास्त लांब सीट मिळते.
Splendor+ XTEC 2.0 ची किंमतया नवीन बाईकमध्ये 100 सीसी इंजिन मिळते, जे 7.9 बीएचपी पॉवर आणि 8.05 Nm चा मॅक्स टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. ही बाईक मॅट ग्रे, ग्लॉस ब्लॅक आणि ग्लॉस रेड कलरमध्ये उपलब्ध असेल. बाईकच्या किमतीबद्दल बोलायचे झाल्यास, कंपनीने या बाईकसाठी 82911 रुपये(एक्स-शोरुम) किंमत ठेवली आहे.