नवी दिल्ली : देशातील सर्वाधिक विकली जाणारी मोटरसायकल Hero Splendor+ कंपनीने पूर्णपणे नवीन रूपात लॉन्च केली आहे. यात 4 नवीन रंग आणि अनेक उत्तम फीचर्स मिळणार आहेत. याशिवाय, मोटरसायकलची किंमतही किफायतशीर ठेवण्यात आली आहे.
Hero Splendor लोकांमध्ये 'जनता की मोटरसायकल' या नावाने लोकप्रिय आहे. या मोटरसायकलची निर्माता कंपनी Hero MotoCorp ने त्याची नवीन आवृत्ती Hero Splendor + XTEC लाँच केली आहे.
i3S पेटंट टेक्नॉलॉजीनवीन Hero Splendor+ XTEC मध्ये 97.2cc चे BS-6 इंजिन असणार आहे. ते 7.9 bhp ची मॅकस पॉवर आणि 8.5Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. कंपनीने यामध्ये आपली i3S पेटंट टेक्नॉलॉजी दिली आहे, ज्यामुळे ही मोटरसायकल उत्तम मायलेज देते.
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, मायलेज इंडिकेटरसह अनेक फीचर्सनवीन Hero Splendor+ XTEC मध्ये ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीटर, रिअल टाईम मायलेज इंडिकेटर, कॉल आणि एसएमएस अलर्ट, फ्युएल इंडिकेटर, एलईडी हेडलॅम्प, यूएसबी चार्जर, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ आणि स्टॉप-स्टार्ट सिस्टम यांसारखी नवीन फीचर्स मिळतील. दुसरीकडे, तोल गेल्याने तुमची मोटारसायकल घसरली तरी इंजिन आपोआप बंद होईल.
चार नवीन रंगात उपलब्धनवीन Hero Splendor + XTEC चार नवीन रंगामध्ये लॉन्च करण्यात आली आहे. Sparkling Beta Blue, Canvas Black, Tornado Grey आणि Pearl White या रंगात आहे. XTEC रेंजमध्ये Hero Glamour 125, Pleasure+ 110 आणि Destini 125 च्या यशानंतर कंपनीने ही सर्वात लोकप्रिय मोटारसायकल Hero Splendor+ सोबत लॉन्च केली आहे.
इतकी आहे Hero Splendor+ XTEC ची किंमतHero Splendor+ XTEC ची दिल्लीतील एक्स-शोरूम किंमत 72,900 रुपये आहे. यासोबत कंपनी 5 वर्षांची वॉरंटी देत आहे.