नवी दिल्ली-
होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडिया कंपनी लवकरच भारतीय बाजारात आपली लोकप्रिय स्कूटर Honda Activa 125 चं नव मॉडल लॉन्च करणार आहे. स्कूटर लॉन्च होण्याआधीच तिचे फिचर्स लीक झाले आहेत. जसं की काही कंपनीनं नुकतंच Activa 6G स्कूटरला Smart-Key फिचरसह बाजारात लॉन्च केलं. आता त्याच पद्धतीनं Activa 125 स्कूटरलाही अपडेट केलं जाणार आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार आता Activa 125 देखील स्मार्ट-की फिचरसह उपलब्ध करुन दिली जाणार आहे. फक्त एकाच बटणावर सर्व काम होणार आहे. यात स्कूटर लॉक-अनलॉक करणं असो किंवा मग फ्युअल-लीड उघडणं असो सगळं स्मार्ट-कीनं ऑपरेट होणार आहे. तुमची स्कूटर समजा एखाद्या पार्किंगमध्ये आहे आणि तुम्हाला शोधण्यासाठी अडचण होत असेल तर स्मार्ट-कीच्या माध्यमातून एक बटण दाबताच तुमच्या स्कूटरचे इंडिकेटर्स ब्लिंक होतील. ज्या पद्धतीनं कारमध्ये हे फिचर्स पाहायला मिळतात तेच आता स्कूटरमध्येही उपलब्ध होणार आहे.
स्मार्ट सिस्टममध्ये तुम्ही फक्त एका पूश बटणमध्येच स्कूटर सुरू करू शकणार आहात. याशिवाय तांत्रिकदृष्ट्या तुमची स्कूटर सुरक्षित होणार आहे. जसं की स्मार्ट-की स्कूटरपासून जवळपास २ मीटर दूर असेल तर तुमची स्कूटर आपोआप लॉक होऊन जाईल. याशिवाय एलईडी हेडलाइट, कंसोलमध्ये डिजिटल इनसेट आणि साइट स्डँड कट ऑफ हे फिचर्स देखील मिळणार आहेत.
किंमत किती असेल?अद्या स्कूटरच्या अधिकृत लॉन्चबाबत घोषणा झालेली नसल्यानं अचूक किंमत सांगणं कठीण आहे. पण समोर आलेल्या माहितीनुसार नव्या अपडेट्समुळे स्कूटरच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेली Honda Activa 125 ची किंमत ७७,७४३ रुपयांपासून (एक्स-शोरुम) सुरू होते. तर टॉप-मॉडेलची किंमत ८४,९१९ रुपये (एक्स-शोरुम) इतकी आहे. त्यामुळे नव्या फिचर्ससह लॉन्च होणारी Honda Activa 125 H-Smart ची किंमत एक लाखाच्या पुढे असण्याची शक्यता नाकारता येत नाही.