नवी दिल्लीः होंडाच्या अॅक्टिव्हानं बाजारात चांगलाच दबदबा निर्माण केलेला आहे. Activaच्या 4G आणि 5Gनंतर होंडा आज Activa 6G स्कूटर बाजारात उपलब्ध करून दिली आहे. होंडा Activa 6Gचं दिल्लीत अनावरण करण्यात आलं आहे. होंडा अॅक्टिव्हाची ही सहावी आवृत्ती असून, पाचवी आवृत्ती Activa 5G आल्यानंतर जवळपास दोन वर्षांनी लाँच केली आहे. Honda Activa 6Gमध्ये बीएस 6 सुसंगत इंजिन देण्यात आलं असून, याशिवाय स्कूटरमधली यंत्रणाही अद्ययावत करण्यात आली आहे. त्यामुळे या Activaच्या 6Gमध्ये अत्याधुनिक फीचर्स मिळणार आहेत. नव्या आवृत्तीमध्ये काही फीचर्स Activa 5G सारखेच देण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, अॅक्टिव्हा बीएस 4 इंजिनच्या तुलनेत बीएस 6 इंजिन ताकदवान असून, त्याच्या क्युबिक क्षमतेत (cc) बदल करण्यात आला आहे. बीएस 6 इंजिन 109.51cc मिळणार आहे. तर बीएस4 मध्ये 109.19cc इंजिन देण्यात आलं होतं. Activa 6Gमध्ये Activa 5Gचीच पॉवर मिळणार आहे. Activa 5Gच्या सध्याच्या मॉडलची पॉवर 7.96hp आहे. तर Activa 6Gमध्ये 7.79hpची पॉवर देण्यात आली आहे. कोणकोणते मिळणार नवे फीचर्स?नव्या अॅक्टिव्हामध्ये एलईडी हेडलाइट, मल्टी-इन्फर्मेशन डिस्प्लेसह डिजिटल इन्स्ट्रुमेंट कंसोल आणि सायलंट स्टार्ट सिस्टम सारखे फीचर्स मिळणार आहे. तसेच Activa 125 बीएस 6 मॉडलसह साइड स्टँड, डाऊन इंजिन इन्हिबिटर सुविधाही दिल्या आहेत. या नव्या Activa 6Gच्या बीएस 6 आवृत्तीची किंमत Activa 5Gहून अधिक राहणार आहे. तसेच Activa 6Gची किंमत 62 ते 64 हजार रुपयांदरम्यान आहे.
Honda Activa 6G झाली लाँच, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2020 2:58 PM