नवी दिल्ली : होंडा (Honda) 23 जानेवारीला भारतीय बाजारपेठेत नवीन दुचाकी लाँच करण्यासाठी सज्ज आहे. कंपनीने अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक नवीन इनव्हाइट टीझर शेअर केला आहे. ज्यामुळे नवीन दुचाकी लाँच करण्याचे संकेत मिळत आहेत. नवीन दुचाकी ही होंडा अॅक्टिव्हाची 7G व्हर्जन असू शकते, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे अॅक्टिव्हाचे नवीन व्हर्जन इलेक्ट्रिक हायब्रीड टेक्नॉलॉजीसह येणार आहे.
होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने (HMSI) डिसेंबर 2022 मध्ये नवीन स्कूटरसाठी एच स्मार्ट (H-Smart) ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता. कंपनी नवीन अॅक्टिव्हासाठी हा ट्रेडमार्क वापरू शकते असा अंदाज वर्तवला जात आहे. होंडा आपल्या BS4 स्कूटर आणि मोटारसायकलवर होंडा इको टेक्नॉलॉजी (HET) वापरत आहे.vयानंतर, BS6 मध्ये ट्रान्झिशन एन्हांस्ड स्मार्ट पॉवर (eSP) टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला. नवीन टीझरवरून असे संकेत मिळतात की कंपनी नवीन टेक्नॉलॉजीवर काम करत आहे. AI या टेक्नॉलॉजीचा एक भाग असू शकते हे यावरून दिसून येते. मात्र, कंपनी कोणती टेक्नॉलॉजी आणणार आहे, हे 23 जानेवारीलाच स्पष्ट होणार आहे.
होंडा लवकरच वाहनांचे मायलेज वाढवून उत्पादकता वाढवण्यासाठी आणि धावण्याचा खर्च कमी करण्यासाठी डिझाइन केलेली नवीन हायब्रीड टेक्नॉलॉजी सादर करू शकते. कंपनी हायब्रीड सिस्टम वापरण्याचीही शक्यता आहे, ज्यामध्ये वेगळी बॅटरी वापरली जाईल. ही बॅटरी कोणत्याही हायब्रीडप्रमाणेच रिजनरेटिव्ह टेक्नॉलॉजीद्वारे रिचार्ज केली जाईल. होंडाने अद्याप हायब्रीड टेक्नॉलॉजीबाबत कोणतीही माहिती शेअर केलेली नाही. जर कंपनीने 10-15 किमीची फक्त इलेक्ट्रिक राईड ऑफर केली, तर हे पाऊल भारतीय ऑटो मार्केटसाठी गेम चेंजर ठरू शकते.
इलेक्ट्रिक व्हर्जन सुद्धा लाँच होणार?आगामी नवीन होंडा अॅक्टिव्हाच्या प्युअर इलेक्ट्रिक मोडमध्ये प्रतितास 40 किमी टॉप स्पीड मिळण्याची शक्यता आहे. होंडा 23 जानेवारी रोजी हाय-व्होल्टेज, शानदार हायब्रिड डिझाइन देखील सादर करू शकते. लांब प्रवासासाठी आयसीईचा उपयोग सतत उपलब्ध असेल. दरम्यान, हायब्रीड टेक्नॉलॉजीमुळे दुचाकींच्या सध्याच्या किमतींमध्ये वाढ होऊ शकते. भारतीय बाजारपेठेत ईव्ही ऑफर करण्यापूर्वी होंडा आपल्या 2W पोर्टफोलिओमध्ये हायब्रिड टेक्नॉलॉजी जोडण्यास उत्सुक आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप अधिकृत पुष्टीकरणाची प्रतीक्षा आहे.