नवी दिल्ली : भारतीय बाजारपेठेत स्कूटरचे नाव घेतल्यावर एकच नाव डोळ्यासमोर येते, ते म्हणजे 'होंडा अॅक्टिव्हा'. बाजारातील गेली दोन दशके अॅक्टिव्हाची राजवट कोणीही हलवू शकलेले नाही. पण आता होंडा एक मोठा बदल करणार आहे. अॅक्टिव्हाचे शेवटचे मॉडेल आता होंडा अॅक्टिव्हा 6G असणार आहे. आता अॅक्टिव्हा 7G बाजारात येणार नाही. तसेच, आता अॅक्टिव्हासोबत इतर कोणतेही बॅजिंग येणार नाही. नुकत्याच समोर आलेल्या स्कूटरच्या फोटोंवरून हे स्पष्ट होत आहे.
दरम्यान, कंपनीने याबाबत अद्याप खुलासा केलेला नाही. तसेच अॅक्टिव्हाचे नाव आता बदलले जाईल की फक्त बॅजिंगवरून जनरेशन मार्क काढून टाकले जाईल हेही सांगण्यात आलेले नाही. गेल्या काही दिवसांपासून अॅक्टिव्हाचे नवीन मॉडेल लॉन्च झाल्याच्या बातम्याही येत होत्या. पण आत्तापर्यंत कंपनीने नवीन स्कूटरबाबत कोणतेही अपडेट जारी केलेले नाही. आता असे म्हटले जात आहे की, नवीन अॅक्टिव्हा या वर्षाच्या अखेरीस लॉन्च होऊ शकते. परंतु कंपनी या स्कूटरचे नाव बदलेल की नाही याबद्दल माहिती देण्यात आलेली नाही.
H Smart केले होते लाँच यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये कंपनीने अॅक्टिव्हा एच स्मार्च लॉन्च केले होते. या स्कूटरच्या फीचर्समध्ये बदल झाला आणि रिमोट लॉकिंग सिस्टमसह अपग्रेड करण्यात आला होती. भारतात या स्कूटरची सुरुवातीची किंमत 74,536 रुपये एक्स-शोरूम ठेवण्यात आली होती.
बदल करण्याचे कारणकंपनी यापुढे अॅक्टिव्हा बॅजिंग अंतर्गत नवीन जनरेशन लॉन्च करू इच्छित नाही. स्कूटरला पूर्णपणे नवीन लूक आणि फीचर्स देण्यासोबतच कंपनी ती एका नवीन प्लॅटफॉर्मवर लॉन्च करण्याचा विचार करत आहे, असे म्हटले जात आहे. दरम्यान, यामुळे होंडाच्या स्कूटर ब्रँडला हानी पोहोचण्याची शक्यता नसली तरी नवीन स्कूटर देखील अॅक्टिव्हा सारख्याच प्लॅटफॉर्मवर तयार केली जाईल. तसेच, स्कूटरला फीचर्ससह अपडेट केल्यास परफॉर्मन्स अधिक चांगला होईल.