महागड्या पेट्रोल डिझेलमुळे ग्राहक CNG कारकडे वळू लागले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सीएनजी कारची मागणी वाढली आहे. मारुतीकडे 6 सीएनजी कार (Maruti CNG Car) आहेत, तर आणखी दोन लवकरच येणार आहेत. अशावेळी सीएनजी ग्राहकांना आपल्याकडे खेचण्यासाठी टाटा, फोर्डबरोबर होंडादेखील आपली सीएनजी कार लवकरच बाजारात आणणार आहे. ( Honda Amaze will receive a mid-life facelift in August 2021. Honda Amaze CNG variant has been spotted testing.)
Ola Electric Scooter बुक केलीय? जरा हे पाच पर्याय बघून घ्या; 240 किमीची रेंज, 70 मिनिटांत फुल चार्ज
भारतीय बाजारात सेदान सेगमेंटमध्ये सध्या ह्युंदाई ऑरा ही एकच कार सीएनजीमध्ये आहे. तर मारुतीची डिझायर, फोर्डची अस्पायर आणि टाटाची टिगॉर येण्याची शक्यता आहे. यामुळे होंडाच्या नव्या सीएनजी अमेझ कारला ह्युंदाई आणि मारुतीच्या कारसोबत टक्कर द्यावी लागणार आहे. Honda Amaze CNG व्हेरिअंट टेस्टिंग करताना दिसले आहे.
Maruti CNG Car: मारुतीच्या दोन सीएनजी कार लवकरच लाँच होणार; शानदार मायलेज अन् पैशांची बचत
कदाचित मारुती डिझायर आणि होंडा अमेझ एकाच महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. होंडाने जर अमेझ सीएनजीमध्ये लाँच केली तर ती कंपनीची पहिली सीएनजी कार असेल. कंपनीने अद्याप यावर काही माहिती दिलेली नाही. 17 ऑगस्टला होंडा आपली अमेझची फेसलिफ्ट लाँच करणार आहे. सध्याच्या अमेझमध्ये बाहेरून आणि आतून अनेक बदल अपेक्षित आहेत. चांगले फिचर मिळण्याची शक्यता आहे. इंजिन सेटअप बदलण्याची शक्यता कमी आहे.
TATA Nexon सीएनजीमध्येही येण्याची शक्यता; पुण्यात टेस्टिंगवेळी झाली स्पॉट
होंडाने अमेझचे पहिले फेसलिफ्ट 2018 मध्ये लाँच झाले होते. पहिल्या अमेझचा चेहरामोहराच कंपनीने बदलला होता. नव्या थिमवर दुसरी अमेझ लाँच झाली होती. आता कंपनी यामध्ये नवीन रंग देऊ शकते. सध्याच्या अमेझची किंमत दिल्लीत 6.22 ते 9.99 लाखांच्या आसपास आहे.
एप्रिल महिन्यात टाटा मोटर्सने (Tata Motors) त्यांच्या ताफ्यातील काही कार सीएनजी (CNG) पर्यायातही उपलब्ध करण्याची घोषणा केली होती. यानंतर टियागो (Tiago CNG) ही हॅचबॅक कार सीएनजी टेस्टिंग करताना दिसली होती. आता सर्वाधिक खपाची बनलेली आणि पेट्रोल, डिझेलसह इलेक्ट्रीक अवतारात असलेली फाईव्ह स्टार रेटिंगवाली कॉम्पॅक्ट एसयुव्ही नेक्सॉन (Tata Nexon) देखील सीएनजीमध्ये येण्याची शक्यता आहे.