शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024:- घासून येणार की ठासून? धाकधूक अन् टेन्शन!; ‘काहीही होऊ शकते’ असे किमान १०० मतदारसंघ
2
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
4
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
5
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: विधानसभेच्या मतमोजणीला सुरुवात; काही मतदारसंघातील कल हाती!
6
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
7
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
8
Maharashtra Vidhan Sabha 2024: मान्यता टिकविण्यासाठी मनसेला हवे तीन आमदार!
9
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
10
"शेवटचे मत मोजेपर्यंत मोजणी केंद्र सोडू नका, निवडून आल्यावर थेट मुंबईला या"
11
निकालानंतरच्या रणनीतीवर भाजपची बैठक; आमदारांना विशेष विमानाने आणण्याची शक्यता
12
लोकसभेच्या तुलनेत महिलांचे मतदान 43 लाखाने वाढले; निकालात निर्णायक ठरणार का?
13
‘कॅश फॉर व्होट’प्रकरण; गुजरातमधून अटक केलेल्या व्यक्तीला कोठडी
14
आरोपींच्या खात्यात पैसे टाकणारा जाळ्यात; बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी अकोल्यात कारवाई
15
दक्षिणेतील अभिनेत्यांना मुंबईच्या रिअल इस्टेटची भुरळ; वर्षभरात १०० कोटी रूपयांहून अधिक गुंतवणूक
16
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
17
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
18
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
19
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
20
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण

2021 Honda Amaze facelift कार उद्या होणार लाँच; पाहा काय आहे विशेष आणि किंमत

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 5:18 PM

Honda Amaze facelift car launch : या मॉडेलमध्ये ग्राहकांना अनेक बदल पाहायला मिळू शकतात. केवळ 5 हजार रूपये देऊन करता येणार बुक. 

ठळक मुद्देया मॉडेलमध्ये ग्राहकांना अनेक बदल पाहायला मिळू शकतात. केवळ 5 हजार रूपये देऊन करता येणार बुक. 

Honda Amaze भारतातील सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या सब-कॉम्पॅक्ट सेडान कार्सपैकी एक आहे. जपानची वाहन उत्पादक कंपनी होंडाच्या बेस्ट सेलिंग कार्सपैकी ही एक आहे.  या कारची टक्कर  Maruti Suzuki Dzire, Hyundai Aura, Ford Aspire, Volkswagen Ameo सारख्या कार्ससोबत आहे. 2018 मध्ये ऑटो एक्स्पोमध्ये सेकंड जनरेशन होंडा अमेझ लाँच केल्यानंतर कंपनी आता या कारचं फेसलिफ्ट मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. (honda amaze facelift 2021 booking starts in with just rs 5000 token amount check amazing features and price)

Honda कंपनी 18 ऑगस्ट रोजी Honda Amaze ही नवीन कार फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये लाँच करणार आहे. नवीन Honda Amaze साठी कंपनीच्या वेबसाइटवरून ऑनलाइन प्री-बुकिंग 5 हजार रुपयांत करता येईल, तर डीलरशिप्समध्ये प्री-बुकिंगसाठी 21 हजार रुपये टोकन अमाऊंट असेल. नवीन फेसलिफ्ट मॉडलमध्ये डिझाइन अपडेटसोबतच नवीन फीचर्स मिळणार असून, ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी कार असल्याचं सांगितलं जात आहे. 

Honda Amaze Facelift मध्ये नवं काय?अमेझ फेसलिफ्ट काही नवीन आकर्षक रंगांमध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. कारमध्ये फुल एलईडी हेडलँप, नवीन अलॉय व्हील्स, नवीन फ्रंट आणि रिअर बंपर मिळण्याची शक्यता आहे. कारच्या समोरील बाजूला जास्त क्रोम एलिमेंटचा वापर केलेला दिसू शकतो, तर इंटीरियरमध्ये नवीन फॅब्रिक अपहोल्स्ट्री आणि नवीन डॅशबोर्ड लेआउट मिळेल. सेच कारच्या बेसिक व्हेरिअंटमध्ये जास्त स्टँडर्ड फीचर्सचा समावेश झालेला असेल. यासोबतच नवीन होंडा अमेझ फेसलिफ्टच्या किंमतीतही थोडीफार वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

किती असेल किंमत?2021 होंडा अमेझ फेसलिफ्टमध्ये सध्याच्या मॉडेलमधील इंजिन आणि गिअरबॉक्सचाच वापर केला जाईल, असं सांगितलं जात आहे. सध्या पेट्रोल व्हर्जन इंजिन 1.2 लीटर आणि डिझेल व्हर्जनमध्ये 1.5 लिटर डिझेल इंजिनसह होंडा अमेझ येते. आताच्या घडीला अमेझची एक्स-शोरुम किंमत 6.22 लाख ते 9.99 लाख रुपये आहे. नवीन फेसलिफ्ट अमेझची किंमत 25 हजारांनी किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Honda Amazeहोंडा अमेझHondaहोंडाcarकारIndiaभारतMaruti Suzukiमारुती सुझुकीHyundaiह्युंदाई