नवी दिल्ली : होंडा कार्स इंडियाने ( Honda Cars India) सणासुदीच्या काळात आपल्या कारची विक्री वाढवण्यासाठी खास ऑफर आणली आहे. या ऑफरला कंपनीने ड्राइव्ह इन 2022 , पे इन 2023 (Drive in 2022, Pay in 2023) असे नाव दिले आहे. कंपनीची ही ऑफर 31 ऑक्टोबरपर्यंत आहे. Honda Cars ची ही ऑफर एक स्पेशल फायनान्स स्कीम आहे, ज्यासाठी कंपनीने Kotak Mahindra Prime Limited च्या संयुक्त विद्यमाने आणली केली आहे.
होंडाची ही स्पेशल फायनान्स स्कीम फक्त कंपनीच्या होंडा अमेज (Honda Amaze) आणि होंडा सिटी (Honda City) वर वैध आहे. होंडाच्या या स्पेशल फायनान्स स्कीमनुसार, कंपनी या दोन कारच्या खरेदीवर ग्राहकांना एक ऑफर देत आहे, ज्यामध्ये ते 2022 मध्ये या कार खरेदी करू शकतात, त्यानंतर 2023 पासून या कारचा मासिक EMI सुरू होईल. Honda Cars आणि Kotak Mahindra यांच्या भागीदारीतील या फेस्टिव्ह फायनान्स स्कीमचे डिटेल्स वाचल्यानंतर, तुम्ही Honda Amaze आणि Honda City ची माहिती जाणून घ्या.
Honda AmazeHonda Amaze ही मिड-रेंज सेडान आहे, जी तिच्या डिझाइन आणि मायलेजसाठी पसंत केली जाते. कंपनीने या कारचे तीन ट्रिम बाजारात आणले आहेत.
Honda Amaze PriceHonda Amaze ची सुरुवातीची किंमत 6.63 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरिएंटवर 11.50 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) पर्यंत जाते.
Honda Amaze Engine and TransmissionHonda Amaze मध्ये 1.2-लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 90 PS पॉवर आणि 110 Nm पीक टॉर्क जनरेट करते. त्याचे दुसरे इंजिन 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे, जे 100 PS पॉवर आणि 200 Nm पीक टॉर्क जनरेट करते. या दोन्ही इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि CVT ट्रान्समिशनचा पर्याय देण्यात आला आहे.
Honda CityHonda City ही सेडान सेगमेंटची प्रीमियम कार आहे, जी तिच्या डिझाइन, केबिन स्पेस आणि फीचर्समुळे पसंत केली जाते. कंपनीने आतापर्यंत या कारचे तीन ट्रिम बाजारात आणले आहेत.
Honda City PriceHonda City सेडानची किंमत 11.57 लाख रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे, जी टॉप व्हेरिएंटमध्ये 15.52 लाख रुपये आहे.
Honda City Engine and TransmissionHonda City मध्ये कंपनीने दोन इंजिनांचा पर्याय दिला आहे. यातील पहिले इंजिन 1.5 लिटर पेट्रोल इंजिन आहे, जे 121 पीएस पॉवर आणि 145 एनएम पीक टॉर्क जनरेट करते. दुसरे 1.5-लिटर डिझेल इंजिन आहे जे 100 PS पॉवर आणि 200 Nm पीक टॉर्क जनरेट करते. ही दोन्ही इंजिने 6 स्पीड गिअरबॉक्स आणि 7 स्पीड CVT ट्रान्समिशनच्या पर्यायासह उपलब्ध आहेत.