फेस्टीव्हल सीझनच्या पार्श्वभूमीवर होंडा कार इंडियानं कंपनीच्या जवळपास सर्वच कारवर मोठा डिस्काऊंट जाहीर केला आहे. कंपनीनं या डिस्काऊंटला ऑफरला नवरात्री फेस्टीव्हल ऑफर असं नाव दिलं आहे. कंपनीनं आपल्या वेगवेगळ्या कारच्या पाच मॉडल्सवर २७ हजार रुपयांपर्यंतची सूट जाहीर केली आहे. होंडा सिटीसह होंडा एचआर-व्हीपर्यंत विविध कारवर कंपनीनं सूट जाहीर केली आहे. ही ऑफर ३० सप्टेंबर २०२२ पर्यंतच वैध राहणार आहे. त्यामुळे नवरात्र किंवा दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर नवी कार घेण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.
होंडा सिटी 5th जनरेशनकंपनीच्या नव्या जनरेशनच्या होंडा सिटीवर ५ हजार रुपयांचा कॅश डिस्काऊंट जाहीर केला आहे. याशिवाय कार एक्ज्चेंजवरही ५ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला आहे. याशिवाय कंपनीकडून ५ हजार रुपयांचा लॉयल्टी बोनस आणि ७ हजार रुपयांचा होंडा टू होंडा एक्स्चेंज बोनस देखील ग्राहकांना दिला जात आहे. यासोबतच कंपनीकडून ५ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट देखील दिला जाणार आहे.
होंडा WR-V वर डिस्काऊंटहोंडा कार्स इंडिया होंडा HR-V वर एकूण २७ हजार रुपयांचा डिस्काऊंट कंपनीनं जाहीर केला आहे. कंपनी या कारच्या एक्स्चेंज बोनसच्या स्वरुपात १० हजार रुपयांचा डिस्काऊंट देत आहे. तुम्ही जर जुनी होंडा डब्ल्यूआर-व्ही बदलून नवी डब्ल्यूआर-व्ही खरेदी करणार असाल तर तुम्हाला बोनसचा लाभ घेता येईल. होंडानं ग्राहकांना लॉयल्टी बोनसच्या रुपात ५ हजार रुपयांची सूट दिली आहे. सोबत ५ हजारांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट देखील मिळणार आहे. होंडा टू होंडा कार एक्स्चेंज बोनसच्या रुपात ७ हजार रुपयांचा अतिरिक्त बोनस दिला जाईल.
हॅचबॅक कार Honda Jazzहोंडा आपल्या प्रीमिअम हॅचबॅक कार Honda Jazz वर एक्स्चेंज डिस्काऊंटच्या रुपात १० हजार रुपयांची सूट ग्राहकांना देत आहे. यासोबतच या कारवर ५ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट देखील मिळत आहे. होंडानं ग्राहकांसाठी लॉयल्टी बोनसच्या रुपात ५ हजार रुपयांची देखील सूट दिली आहे. तसंच होंडा टू होंडा कार एक्स्चेंज करणाऱ्या ग्राहकांना ७ हजार रुपयांचा अतिरिक्त बोनस दिला जात आहे.
होंडा सिटी 4th जनरेशनफोर्थ जनरेशनच्या सेडान होंडा सिटी कारवर सप्टेंबर महिन्यात कंपनीकडून कोणत्याही प्रकारचा कॅश एक्स्चेंज बोनस देत नाहीय. तसंच या कारवर फक्त लॉयल्टी बोनसच्या रुपात ५ हजार रुपयांत डिस्काऊंट मिळत आहे.
होंडा अमेजवर ऑफरहोंडाच्या शानदान आणि सर्वाधिक विक्री होणाऱ्या सेदान कारवर या महिन्यात कॉर्पोरेट डिस्काऊंटच्या रुपात ३ हजार रुपयांची सूट दिली जात आहे. याशिवाय कंपनीकडून ५ हजार रुपयांचा कॉर्पोरेट डिस्काऊंट दिला जात आहे.